LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

आधी देश, मग ....! लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी जवान सीमेवर ...!!

जळगाव : लग्नाला अवघे तीन दिवस झाले आणि मेहंदीचा रंग फिका पडण्याआधीच सैन्यात असलेल्या वराला देशाच्या संरक्षणासाठी सरहद्दीवर जावे लागले.
यामुळे डोळ्यात साठवलेली स्वप्नं डोळ्यात तरळलेल्या पाण्याने धुवून निघाली. पण, आधी देशसेवा आणि मग संसार असे म्हणणाऱ्या नवं वधूने ' माझं कुंकू मी ऑपरेशन सिंदूरसाठी पाठवलं आहे ' असे गर्वाने सांगत 'देशासाठी वाट्टेल ते ' हे सिद्ध केले.


जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्याचे जवान मनोज पाटील यांचा विवाह 5 मे रोजी यामिनीसोबत पार पडला. मात्र, अवघ्या तीन दिवसांत म्हणजे 8 मे रोजी रजेवर गेलेल्या मनोजला सेवेत रुजू होण्याचा आदेश आला. देशसेवेचा हाकेला ओ देत मनोज यांनी नवं वधूला निरोप देत सीमेवर हजेरी लावली. त्यांच्या पत्नी यामिनी यांनीही कां..कु... न करता ' माझं कुंकू मी ऑपरेशन सिंदूरसाठी पाठवलं आहे. असे म्हणत हा क्षण निभावून नेला.


पेहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा बळी गेला. या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर केंद्र सरकारच्या आदेशावरून भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यामुळे हबकलेल्या पाकिस्तानने पुन्हा कुरघोड्या चालविल्या आणि सीमेवर युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. यामुळे सुट्टीवर गेलेल्या जवानांना तातडीने सेवेत रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आणि पाचोरा येथील जवान मनोज पाटील यांनाही लग्न झालेल्या अवघ्या तिसऱ्या दिवशी कर्तव्यात हजर व्हावं लागलं.
ही कथा केवळ एका जोडप्याची नाही, तर भारतीय जवान आणि त्यांच्या कुटुंबांच्या त्यागाची आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
शांतिनिकेतन, संत मीरा,  देवेंद्र जीनगौडाने कब्बडी स्पर्धेत गाठली अंतिम फेरीजिल्हाधिकाऱ्यांनी केले उपमुख्यमंत्र्यांचे स्वागतराखेने भरलेला ट्रक विजेच्या खांबावर आदळून झाला पलटीपाणी पुरवठा विभागाने घेतली BN7 NEWS च्या वृत्ताची दखल : अवघ्या 8 तासात केली ' त्या ' जलवाहिनीची दुरुस्ती शिवराज्याभिषेक सोहळा : ज्ञानमंदिर बनले होते शिवमयविजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यूश्री मारुती नगरला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी विद्याभारती जिल्हास्तरीय शैक्षणिक संमेल्लन उत्साहात.गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 10 लाखांची शिष्यवृत्ती : पोतदार एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम132 जणांनी केले रक्तदान : रक्तदात्यांना 1 लाखांचा विमा :  राष्ट्रीय बसव दलाचा आदर्श उपक्रम