LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

' त्या ' घटनेतील मृत कामगारांच्या कुटुंबियांना 25 लाखांची मदत

एच. डी. कुमारस्वामी यांनी दिली घटनास्थळी भेट : केली जखमी कामगारांच्या प्रकृतीची चौकशी

विशाखापट्टणम : येथील विशाखा स्टील प्लांटमध्ये झालेल्या भीषण स्फोटात अनेक कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच केंद्रीय अवजड उद्योग व पोलाद मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

स्टील वितळविणाऱ्या युनिटमधील उष्णतारोधक द्रवरूप वाहिनीमधून धातूची गळती झाल्याने हा स्फोट झाला असावा, असा प्राथमिक अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. याबाबत अधिकाऱ्यांनी मंत्री कुमारस्वामी यांना सविस्तर माहिती दिली. दुर्घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर त्यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले तसेच मृत्यू आणि अपघातामागील कारणांचा तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश कारखाना प्रशासनाला दिले.

या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या प्रत्येक कामगाराच्या कुटुंबाला  25 लाखांची आर्थिक मदत देण्यात येईल. तसेच कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्यात येणार असून इतर सर्व सेवा लाभही दिले जातील, अशी घोषणा मंत्री कुमारस्वामी यांनी केली आहे.
गंभीर जखमी कामगारांना 10 लाखांची मदत दिली जाईल. तसेच त्यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च स्टील प्लांट प्रशासन उचलणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
याशिवाय मृत कामगारांच्या कुटुंबियांना त्यांच्या नियोजित निवृत्ती दिनांकापर्यंत स्टील प्लांट टाउनशिपमधील निवासस्थानी राहण्याची विशेष परवानगी देण्यात येणार आहे. मृत कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्चही कारखान्याकडून करण्यात येईल. कायमस्वरूपी कामगारांना मिळणाऱ्या सर्व सुविधा आणि भरपाई गुत्तेदार (कंत्राटी) कामगारांनाही समान प्रमाणात दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मंत्री कुमारस्वामी यांनी रुग्णालयात जाऊन जखमी कामगारांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. तसेच मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

' संस्थेकडे कठोर सुरक्षा व्यवस्था असूनही ही दुर्घटना घडली आहे. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर उपाययोजना करण्यात येतील. या प्रकरणाची सर्वंकष आणि निष्पक्ष चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत ' , असे कुमारस्वामी यांनी सांगितले.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा युवकांचा विजय; लोकशाहीचा विजय असल्याचा सिद्धरामय्या यांचा दावाबायपाससाठी जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध; एकरी ₹5 कोटी भरपाईच्या मागणीसाठी 30 जुलैला चक्काजाम आंदोलनधावत्या बसमध्ये सुरू झाला वाद; विद्यार्थ्यांमध्ये बेल्ट, दगड आणि काठ्यांनी तुफान हाणामारी!सेवानिवृत्तीनिमित्त सविता चंदगडकर-निकम यांचा वेदांत-गुरुस्पंदनने केला सन्मान मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते खरीप पीकविमा योजनेच्या माहितीपत्रकाचे प्रकाशनराजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाईन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद :  1011 विद्यार्थ्यांनी घेतला होता स्पर्धेत सहभागभडगावजवळील पूल कोसळला :  गडहिंग्लज-नेसरी रस्ता बंद मुडलगीत पावसासाठी गाढवांचा विवाह :  निमंत्रणपत्रिका सोशल मीडियावर व्हायरलमुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळली :  सुदैवाने बचावले सात जणांचे प्राणआणि दाम्पत्यांने मागितली इच्छामरणाची परवानगी