LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

वीज क्षेत्राच्या खासगीकरणाविरोधात शेतकऱ्यांनी  छेडले आंदोलन ...!

अथणी :  अथणी येथील शेतकऱ्यांनी राज्य सरकारच्या वीज क्षेत्र खासगीकरणाच्या हालचालींविरोधात जोरदार आंदोलन छेडले. सरकारच्या निर्णयाचा निषेध करत शेतकऱ्यांनी तालुका कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या शेतकरी नेत्यांनी सरकारच्या धोरणांवर तीव्र टीका केली. "वीज क्षेत्राचे पूर्णपणे खासगीकरण झाल्यास शेतकऱ्यांना मिळणारी मोफत वीज बंद होईल. तसेच शेतातील ट्रान्सफॉर्मर बिघडल्यास त्याच्या दुरुस्तीचा खर्चही शेतकऱ्यांनाच उचलावा लागेल. यामुळे शेती क्षेत्राचे मोठे नुकसान होईल," असे आंदोलकांनी यावेळी म्हटले.
 "सरकारने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा. वीज क्षेत्राच्या खासगीकरणाचा प्रस्ताव रद्द न केल्यास केवळ अथणीतच नव्हे तर संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन उभारले जाईल," असा ईशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला. 
शेतकऱ्यांनी सरकारने वीज क्षेत्र खासगीकरणाचा निर्णय मागे घेऊन शेतकरी हिताचे धोरण राबवावे, अशी मागणी यावेळी केली.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
गरजू सर्वसामान्यांची पडताळणी करूनच घरकुले देण्याची बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांची सूचनाअल्पवयीन दलित मुलीची आत्महत्या :  आरोपी फरार ?वीज क्षेत्राच्या खासगीकरणाविरोधात शेतकऱ्यांनी  छेडले आंदोलन ...!पूर परिस्थितीला तोंड देण्यासाठी चिक्कोडी प्रशासन सज्ज :  नागरिकांच्या सुरक्षेसाठी व्यापक तयारीदैवज्ञ ज्वेलरी असोसिएशनने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट : केली कृतज्ञता व्यक्त ..!काय सांगताय .....! वसतीगृहात विद्यार्थिनींची ओली पार्टी ..?....आणि जिल्हाधिकाऱ्यांनी ' त्या ' बालकाला दिले ' यतीन ' असे नाव : भावनापूर्ण आणि हृदयस्पर्शी कार्यक्रमाने झाले सारेच भावूक : जिल्हाधिकाऱ्यांनी जिंकली साऱ्यांचीच मनं ...!!रौडीशीटर्सना खाकीचा दणका ..!विद्यार्थ्यांना साडेचार हजार वह्यांचे वाटप : व्ही. पी. ग्रुपचा स्तुत्य उपक्रमगुन्हेगारी प्रवृत्तीच्या विरोधात निपाणीत धडक कारवाई :  पोलिसांकडून ‌बुलेटसह तलवारी जप्त