बेळगाव : शहापूर पोस्ट ऑफिस येथील पोस्टमास्टर एस. पी. कांबळे हे 35 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत असल्याने त्यांना कार्यालयाच्यावतीने भावनापूर्ण निरोप देण्यात आला.
त्यांनी आपल्या सेवा कार्य कालावधीत चिक्कोडी, कुडची, अथणी बेळगाव येथील शहापूर पोस्ट ऑफिस येथे सेवा बजावली आहे. त्यांचा सेवानिवृत्ती निरोप समारंभ शहापूर पोस्ट ऑफिस येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इन्चार्ज पोस्टमास्टर एम. डब्ल्यू. जोशी हे होते. यावेळी साउथ इन्स्पेक्टर सोमशेखर मुंडगली, नॉर्थ एएसपी बी. पी. मळगी, सामाजिक कार्यकर्ते हिरालाल चव्हाण आदी उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते एस. पी. कांबळे यांचा म्हैसूरी फेटा, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी पोस्टमन व्यंकटेश मुबनूर, संतोष हट्टी, सविता जोळ्ळद , भस्मे आदींची भाषणे झाली. बी. आर. ओमतार यांनी सूत्रसंचालन केले आर. व्ही. अंगडी यांनी आभार मानले.
#shahapurpost
#retirement
#spkamble