LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने पीडिओंची कान उघाडणी : 

तहसीलदार मुंजे यांची मानकापूरला भेट ; तात्काळ दुरुस्तीचे आदेश 

निपाणी :दीड महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे मानकापूर येथील सरकारी शाळेचे छत उडून जाण्यासह संरक्षण भिंत कोसळून इतर साहित्याचे नुकसान झाले होते. त्यामुळे शाळा सुरू होण्यापूर्वी त्याची दुरुस्ती करण्याची सूचना तहसील प्रशासनाने संबंधित पिडिओ आणि सीआरपीना केल्या होत्या. पण त्याकडे दुर्लक्ष केल्याने तहसीलदार सुरेश मुंजे आणि तालुका पंचायत कारनिर्वाहक अधिकारी प्रवीण कट्टी यांनी मानकापूर शाळेला भेट देऊन छताची दुरुस्ती न केल्याने संबंधितांना धारेवर धरून त्यांची कान उघाडणी केली.
सोमवार दिनांक 1 जूनपासूनपासून राज्यातील शाळांना प्रारंभ होणार आहे. त्यापासून वर बहुतांश शाळांमध्ये स्वच्छतेची कामे पूर्ण झाली आहेत. अशा परिस्थितीत वादळी वारा आणि पावसामुळे नुकसान झालेल्या छतांची दुरुस्ती न केल्याने अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा उघड झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थासह पालकातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सध्या दुरुस्तीचे आदेश दिले असले तरी काम होण्यासाठी किमान चार-पाच दिवसाचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे या कालावधीत विद्यार्थी कुठे बसणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
तहसीलदार मुंजे म्हणाले, वादळी वारा आणि पावसामुळे नुकसान झालेल्या छतांची दुरुस्ती करण्याची सूचना यापूर्वी केली होती. संबंधित अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. तात्काळ काम करून विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्याचे सांगितले. यावेळी ‌ग्रामपंचायत अध्यक्ष सुनील म्हाकाळे,रयत संघटनेचे निपाणी तालुका उपाध्यक्ष बबन जामदार, शाखा अध्यक्ष पवनकुमार माने, ग्रामपंचायत सदस्य राजू  कुंभार, प्रमोद शेवाळे, विकास वराळे, लक्ष्मण माने, राहुल वराळे यांच्यासह ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.
----

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
जन्मदिनीच काळाने घातला घाला : अपघातात झाला तरुणाचा मृत्यूपैशासाठी जन्म दिलेल्या पोराने जन्मदात्या आईला काढले घराबाहेर ...!नणंदेने रचला वहिनीच्या खुनाचा कट : नातेवाईकांकरवी करविला खून आणि रचला दरोड्याचा बनाव : चाणाक्ष पोलिसांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्याआयपीएल फायनलच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त बोरसे यांनी केल्या आहेत सूचना : सार्वजनिक ठिकाणी जल्लोषास मनाई सतीश जारकीहोळी समर्थकांचे गणेशाला साकडे ...!  मंत्रीपदासह केपीसीसी अध्यक्षपद मिळावे यासाठी केली श्री गणेशाची  विशेष पूजा ..!!गोव्यातील वाहतूक दंडांबाबत दिलासा देण्याची मागणी : माजी आमदार अनिल बेनके यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदनउपमुख्यमंत्री पदाबाबतचा  प्रस्ताव अद्याप आलेला नाही :  3 जूनच्या बैठकीत अंतिम निर्णय : मल्लिकार्जुन खर्गे यांची माहितीनिपाणीत सोमवारपासून बियाणांचे वाटप  एकरी 30 किलो सोयाबीन ; मूग, उडीदही उपलब्ध शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने पीडिओंची कान उघाडणी : जागतिक दर्जाचा 5  कोटींचा जलतरण तलाव दुरवस्थेत ...!