LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

पर्यावरणाचा संरक्षणाची  जबाबदारी ही प्रत्येकाची :  नगराध्यक्ष दिगंबर कांबळे 

निपाणी :  वाढते प्रदूषण, जंगलतोड आणि हवामानातील बदल यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. भविष्यातील पिढीला सुरक्षित व निरोगी जीवन देण्यासाठी आजच पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे. वृक्षारोपण ही केवळ एक दिवसाची मोहीम नसून झाडांचे संगोपन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने वृक्षलागवड करून त्यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. पर्यावरण संरक्षण ही केवळ शासनाची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे, असे मत बोरगाव येथील नगराध्यक्ष दिगंबर कांबळे यांनी केले.

बोरगाव नगरपंचायत कार्यालय , आर.ए. पाटील पब्लिक स्कूल, श्री अरिहंत मराठी व कन्नड माध्यम शाळा या ठिकाणी जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. प्लास्टिकचा वापर कमी करणे, पाण्याची बचत करणे आणि परिसर स्वच्छ ठेवणे यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत. विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणाचे संस्कार अंगीकारून समाजात जनजागृती निर्माण करावी, असे आवाहन नगराध्यक्ष कांबळे यांनी केले.
आर. ए. पाटील इंग्रजी शाळेकडून प्लास्टिकमुक्त शहर , जलसंवर्धन, स्वच्छता आणि वृक्षसंवर्धन याबाबत नागरिकांनामार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. उपस्थितांनी परिसर स्वच्छ ठेवण्याची तसेच अधिकाधिक झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याची शपथ घेतली. विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षणावर आधारित घोषवाक्ये, चित्रप्रदर्शन आणि जनजागृती फेरी काढून नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण केली.
यावेळी उपनगराध्यक्षा रुक्साना अफराज, सभापती प्रदीप माळी, नगरसेवक अभयकुमार मगदूम, मुख्याधिकारी एस. बी तोडकर, प्रथम दर्जा सहाय्यक राहुल गुडयिनकर द्वितीय दर्जा सहाय्यक पोपट कुरळे आरोग्यनिरीक्षक महेश नंदीकेश्वर, महसूल निरीक्षक संदीप वाईगडे, समुदाय संघटना अधिकारी एम.बी. ब्रिगिमठ, शाळेचे प्रिन्सिपल श्रीनिवास सर, शाळेचे सी.इ.ओ. बाळासाहेब हावले, यांच्यासह सर्व नगरसेवक, शहरवासीय नगरपंचायत पदाधिकारी शाळेचे शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते
--

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट मेरीज संघाला विजेतेपदशिनोळी परिसरात गणेशमूर्तींवर रंगकामाचा अखेरचा हात : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची लगबग; साडेतीनशेहून अधिक मूर्ती सज्जन्यू इंग्लिश स्कूल, मुतगे येथे पालक मेळावा उत्साहात संपन्नमंत्री सतीश जारकीहोळींवर ईडीचा छापा; निकटवर्तीयांच्या घरांवरही झडतीमेंढ्या राखताना तरुणावर मगरीचा हल्ला; पायाला गंभीर दुखापतबेळगावमध्ये उभारण्यात येणार आयटी पार्क : पालक मंत्र्यांनी दिली आराखडा तयार करण्याची सूचना अत्रिवरद मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद सेंटरचे प्रमुख चिकित्सक, वैद्य रुपेश साळुंखे यांना करण्यात आले  'कर्नाटक हेल्थकेअर वैद्यरत्न पुरस्काराने' सन्मानीतविद्याभारती राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेला प्रारंभ : बेळगाव, बळ्ळारी, हावेरी, बेंगळूर, म्हैसूर संघांचा उपांत्य फेरीत प्रवेशराज्य रँकिंग स्पर्धेत बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरीश्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती