LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

अतिक्रमण हटाव मोहिमेला आलाय वेग

गणपत गल्ली, कांदा मार्केटने घेतला मोकळा श्वास

बेळगाव :  वाहनचालक, ग्राहक व स्थानिक नागरिकांकडून वारंवार येणाऱ्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर महापालिका आणि रहदारी नियंत्रण पोलिसांनी  संयुक्तरित्या गणपती गल्ली तसेच कांदा मार्केट परिसरात अतिक्रमण  हटाव मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेमुळे परिसराने मोकळा श्वास घेतला असून स्थानिक नागरिक व वाहनचालकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे. शहरातील इतर गर्दीच्या भागांमध्येही अशाच मोहिमा राबवण्याची मागणी लोकांतून केली जात आहे.

 बेळगाव शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या गणपती गल्ली बाजारपेठ परिसरातील सततच्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर उपाय म्हणून शहर पोलिस व महापालिकेने संयुक्तपणे गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत रस्त्यांवर व पदपथांवर उभारण्यात आलेली अनधिकृत वाढीव बांधकामे, फळ विक्रेत्यांच्या हातगाड्या, तात्पुरती दुकाने, फलक व इतर अडथळे हटवण्यात आले.
कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांना महापालिकेने आखून दिलेल्या पांढऱ्या सीमारेषेतच व्यवसाय करण्याच्या सूचना दिल्या. काही विक्रेत्यांनी स्वयंस्फूर्तीने आपली तात्पुरती अतिक्रमणे हटवली, तर काहींवर थेट कारवाई करण्यात आली. रस्त्यावर अडथळा निर्माण करणारे अनधिकृत फलक व संरचना जप्त करण्यात आल्या.

ही मोहीम उपजीविकेला धक्का देण्यासाठी नसून वाहतूक सुरळीत ठेवणे व सार्वजनिक सुरक्षितता सुनिश्चित करणे हा मुख्य उद्देश असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. सहाय्यक पोलिस आयुक्त जे. आर. निकम यांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पुढेही कडक कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. तसेच पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी नियमित तपासणी व देखरेख केली जाणार असल्याचे महापालिकेने सांगितले.

#encrochment 
#ganapatgalli 
#citycorporation 
#CityPolice 
#AtikramanHatav

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात मुलगा जखमी बेळगाव महापालिकेतील 58 नगरसेवकांच्या मालमत्तेची पडताळणी अतिक्रमण हटाव मोहिमेला आलाय वेगघुसखोरीच्या संशयावरून बेळगाव पोलिसांकडून करण्यात आली 20 जणांची चौकशी ..!वेदगंगा आटल्याने पाणीप्रश्न गंभीर :  शहरवासीयांची पाण्यासाठी होतेय धावाधाव खानापुरात उद्या रंगणार आंतरराष्ट्रीय दंगल ..!इलेक्ट्रिक बाईकच्या बॅटरीचा स्फोट होऊन लागली दुकानाला आग : सुमारे लाख-दीड लाख रुपयांचे झाले नुकसान सहकारी पतसंस्थांच्या कार्यात लोकविश्वास महत्त्वाचा : युवराज हुलजी यांचे प्रतिपादन 52 गंभीर गुन्ह्यांची प्रकरणं राज्य सरकार घेणार मागे ...!टायर फुटल्याने टेम्पो ट्रॅव्हलरच कलंडली : अपघातात तान्हुल्यासह 12 जण जखमी