LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

खासगीकरणाविरोधात हेस्कॉम कर्मचाऱ्यांचा एल्गार  ..!

चिक्कोडी : खासगीकरणाविरोधात चिक्कोडी येथील हेस्कॉम कर्मचाऱ्यांनी एल्गार पुकारला. सरकारने खासगीकरणा हा निर्णय तात्काळ मागे घेतला नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल तसेच कायदेशीर लढा उभारला जाईल.” असा ईशारा आंदोलकांनी दिला.

राज्यातील वीज वितरण क्षेत्राचे खासगीकरण करण्याच्या हालचालींविरोधात हेस्कॉम व केपीटीसीएल कर्मचारी संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. मुंबईस्थित टाटा पॉवर कंपनी लिमिटेडने राज्यातील हेस्कॉमसह १९ जिल्ह्यांमध्ये वीज वितरण परवाना मिळविण्यासाठी अर्ज केल्याच्या पार्श्वभूमीवर चिकोडी येथील हेस्कॉम विभागीय कार्यालयासमोर अधिकारी, कर्मचारी आणि केपीटीसीएल कर्मचारी संघटनेच्या सदस्यांनी मोठे आंदोलन केले.
आंदोलन सभेत बोलताना केपीटीसीएल कर्मचारी संघटनेचे सचिव एस. बी. कुलकर्णी यांनी सांगितले की, “वीज क्षेत्र खासगी कंपन्यांच्या ताब्यात दिल्यास शेतकऱ्यांना मिळणारी मोफत वीज तसेच ‘गंगा कल्याण’सारख्या लोकाभिमुख योजना बंद पडण्याचा धोका आहे. कॉर्पोरेट कंपन्यांच्या नफेखोर धोरणांमुळे शेतकरी आणि सर्वसामान्य ग्राहकांचे मोठे नुकसान होईल. सरकारने हा निर्णय तात्काळ मागे घेतला नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन आणि कायदेशीर लढा उभारला जाईल.”
यावेळी हेस्कॉमच्या अधिकारी सुप्रभा बंदागारा, संजय सुखसरे आणि एस. बी. तहसीलदार यांनीही आपले मत व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, “कर्नाटक राज्याकडे वीज क्षेत्रात उत्कृष्ट पायाभूत सुविधा आणि तांत्रिक क्षमता उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत नफेखोरीसाठी काम करणाऱ्या दुसऱ्या राज्यातील खासगी कंपनीकडे वीज वितरणाची जबाबदारी सोपविणे योग्य नाही. त्यामुळे कर्नाटक वीज नियामक आयोगाने (KERC) टाटा पॉवरचा अर्ज तातडीने फेटाळून लावावा.”
आंदोलनात हेस्कॉमचे अधिकारी सचिन मगदूम, एन. टी. पाटील, डी. ए. मुल्ला यांच्यासह विभागीय कार्यालयातील शेकडो कर्मचारी आणि संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांनी वीज क्षेत्राचे खासगीकरण रोखण्यासाठी एकजूट दाखवत सरकार आणि केईआरसीला आपली भूमिका स्पष्टपणे मांडली.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
श्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती  होन्निहाळ येथील 'त्या' खून खटल्यात 6 ऑगस्टला सुनावण्यात येणार शिक्षा ?धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा युवकांचा विजय; लोकशाहीचा विजय असल्याचा सिद्धरामय्या यांचा दावाबायपाससाठी जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध; एकरी ₹5 कोटी भरपाईच्या मागणीसाठी 30 जुलैला चक्काजाम आंदोलनधावत्या बसमध्ये सुरू झाला वाद; विद्यार्थ्यांमध्ये बेल्ट, दगड आणि काठ्यांनी तुफान हाणामारी!सेवानिवृत्तीनिमित्त सविता चंदगडकर-निकम यांचा वेदांत-गुरुस्पंदनने केला सन्मान मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते खरीप पीकविमा योजनेच्या माहितीपत्रकाचे प्रकाशनराजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाईन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद :  1011 विद्यार्थ्यांनी घेतला होता स्पर्धेत सहभागभडगावजवळील पूल कोसळला :  गडहिंग्लज-नेसरी रस्ता बंद मुडलगीत पावसासाठी गाढवांचा विवाह :  निमंत्रणपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल