LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

उद्या  बेळगावातील अनेक भागात केला जाणार वीजपुरवठा खंडित

बेळगाव : कर्नाटक वीज प्रसारण महामंडळाकडून (केपीटीसीएल) पहिल्या तिमाहीच्या देखभाल व इतर तातडीच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्याने शुक्रवार दिनांक 5 जून जून रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत 110 केव्ही उचगाव उपकेंद्रातून वीजपुरवठा होणाऱ्या अनेक भागांत वीजपुरवठा बंद राहणार आहे.

यामध्ये बिजगर्णी, बोकमूर, कवळेवाडी, बेळवट्टी, बाकनूर, बेळगुंदी, सोनोली, यळेबैल, राकसकोप, कुद्रेमानी, कल्लेहोळ, बेळगुंदी औद्योगिक क्षेत्र, उचगाव, बसुर्ते, बेक्किनकेरी, सुळगा, तुरमुरी, कोणेवाडी, बाची, बेनकनहळ्ळी, सावगाव, मंडोळी, हंगरगा, अंगडी कॉलेज परिसर, गणेशपूर, महालक्ष्मी नगर, आर्मी कॉलनी, केएचबी लेआऊट, बेनकनहळ्ळी गाव तसेच संबंधित गावांतील सिंचन पंपसेट क्षेत्रांचा समावेश आहे.
तसेच, 110 केव्ही उचगाव उपकेंद्रात देखभाल आणि तातडीची दुरुस्तीची कामे सुरू असल्याने 33 केव्ही हिंडलगा उपकेंद्रातून वीजपुरवठा होणाऱ्या हिंडलगा पंपहाऊस, गणेशपूर, हिंडलगा, मन्नूर, सरस्वती नगर, लक्ष्मी नगर, विजय नगर, डिफेन्स कॉलनी, क्रांती नगर, मास्ती नगर, शिवम नगर, गोजगा आणि आंबेवाडी गावांमध्येही सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित राहणार आहे.
यासह संबंधित गावांतील सिंचन पंपसेट क्षेत्रांनाही वीजपुरवठ्यात व्यत्यय येणार असल्याची माहिती हुबळी वीज वितरण कंपनीच्या (हेस्कॉम) बेळगाव ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
श्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती  होन्निहाळ येथील 'त्या' खून खटल्यात 6 ऑगस्टला सुनावण्यात येणार शिक्षा ?धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा युवकांचा विजय; लोकशाहीचा विजय असल्याचा सिद्धरामय्या यांचा दावाबायपाससाठी जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध; एकरी ₹5 कोटी भरपाईच्या मागणीसाठी 30 जुलैला चक्काजाम आंदोलनधावत्या बसमध्ये सुरू झाला वाद; विद्यार्थ्यांमध्ये बेल्ट, दगड आणि काठ्यांनी तुफान हाणामारी!सेवानिवृत्तीनिमित्त सविता चंदगडकर-निकम यांचा वेदांत-गुरुस्पंदनने केला सन्मान मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते खरीप पीकविमा योजनेच्या माहितीपत्रकाचे प्रकाशनराजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाईन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद :  1011 विद्यार्थ्यांनी घेतला होता स्पर्धेत सहभागभडगावजवळील पूल कोसळला :  गडहिंग्लज-नेसरी रस्ता बंद मुडलगीत पावसासाठी गाढवांचा विवाह :  निमंत्रणपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल