LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

रोहित शर्मा, शार्दुल ठाकूर यांना प्रशिक्षण देणारे क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांची बेळगावला धावती भेट

रोहित शर्मा, शार्दुल ठाकूर यांना प्रशिक्षण देणारे क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांची बेळगावला धावती भेट


बेळगाव : मुंबईचे नामवंत क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांनी बेळगाव शिक्षण सोसायटीच्या आवारातील बेळगाव स्पोर्ट्स क्लबच्या प्रशिक्षण केंद्राला धावती भेट देऊन नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन केले.
यावेळी सोसायटीचे चेअरमन आणि बेळगाव स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष अविनाश पोतदार, स्पोर्ट्स क्लबचे कार्यकारी अध्यक्ष दीपक पवार यांच्या हस्ते दिनेश लाड यांचा सत्कार करण्यात आला.
यानंतर अविनाश पोतदार यांनी बेळगाव क्रिकेटच्या गौरवशाली इतिहासाबद्दल आणि वाटचालीबद्दल माहिती देऊन जुन्या खेळाडूंच्या योगदानाचा गौरव केला. ' रोहित शर्मा, शार्दुल ठाकूर, सिद्धेश लाड यासारख्या खेळाडूंना दिनेश लाड यांनी कसे घडविले ' याची माहिती देताना
त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने त्यांचा छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार तर भारत सरकारने द्रोणाचार्य पुरस्कार देऊन गौरव केला आहे "अशी माहितीही अविनाश पोतदार यांनी यावेळी दिली
सत्काराला उत्तर देताना दिनेश लाड यांनी खेळाडूंनी यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेणे किती महत्त्वाचे आहे हे सांगितले. खेळाडूंच्या जडणघडणीत पालकांचा व प्रशिक्षकांचा कसा सहभाग असावा याबद्दलही त्यांनी मार्गदर्शन केले. बेळगाव स्पोर्ट्स क्लबच्या कार्याची स्तूती करून त्यांची वाटचाल गौरवशाली असेल अशी अशा त्यांनी व्यक्ती केली.
यावेळी दिनेश लाड यांच्या हस्ते जुने खेळाडू ज्ञानेश्वर श्रेयकर यांचा बॅट देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बी के मॉडेल शाळेचे मुख्याध्यापक एस. एम. जोशी, रवी घाटगे, बाळकृष्ण पाटील, विजयकुमार पाटील, विठ्ठल भट्ट ,आनंद करडी या मान्यवरासह युवा खेळाडू व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट मेरीज संघाला विजेतेपदशिनोळी परिसरात गणेशमूर्तींवर रंगकामाचा अखेरचा हात : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची लगबग; साडेतीनशेहून अधिक मूर्ती सज्जन्यू इंग्लिश स्कूल, मुतगे येथे पालक मेळावा उत्साहात संपन्नमंत्री सतीश जारकीहोळींवर ईडीचा छापा; निकटवर्तीयांच्या घरांवरही झडतीमेंढ्या राखताना तरुणावर मगरीचा हल्ला; पायाला गंभीर दुखापतबेळगावमध्ये उभारण्यात येणार आयटी पार्क : पालक मंत्र्यांनी दिली आराखडा तयार करण्याची सूचना अत्रिवरद मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद सेंटरचे प्रमुख चिकित्सक, वैद्य रुपेश साळुंखे यांना करण्यात आले  'कर्नाटक हेल्थकेअर वैद्यरत्न पुरस्काराने' सन्मानीतविद्याभारती राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेला प्रारंभ : बेळगाव, बळ्ळारी, हावेरी, बेंगळूर, म्हैसूर संघांचा उपांत्य फेरीत प्रवेशराज्य रँकिंग स्पर्धेत बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरीश्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती