LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

मानवी स्वार्थामुळेच होतोय पर्यावरणाचा ऱ्हास : नामदेव चौगुले

निपाणी :  निसर्ग वाचविणे म्हणजे केवळ झाडे लावणे नव्हे, तर पुढील पिढीचे भविष्य सुरक्षित करणे गरजेचे आहे. वाढते प्रदूषण, उष्णतेची तीव्रता, नष्ट होत चाललेली जंगलसंपदा आणि मानवी स्वार्थामुळे बिघडत आहे. मोबाईल, इंटरनेट आणि कृत्रिम सुखामागे धावताना माणूस निसर्गापासून दूर जात आहे. पण  जगण्यासाठी ऑक्सिजनच लागणार आहे, आणि तो झाडेच देणार आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या वाढदिवशी एक झाड लावून ते जगवण्याचा संकल्प करण्याचे आवाहन

भूमी वात्सल्य सोशल फाउंडेशनचे संस्थापक, पर्यावरण प्रेमी शिक्षक नामदेव चौगुले यांनी केले.
जागतिक पर्यावरणदिनानिमित्त रासाई-शेंडूर येथील विद्यासागर हायस्कूल  आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बी. एम. मधाळे होते.यावेळी वृक्षारोपणासाठी 10 ते 11 फुट उंचीची वड, जांभूळ, पिंपळ, करंज आणि महोगणी यांसारखी दीर्घायुषी व पर्यावरणपूरक रोपे शाळेला भेट देण्यात आली. याशिवाय 'निसर्गदूत' ही पर्यावरण जनजागृती करणारी पुस्तके विद्यार्थ्यांना देण्यात आली. मुख्याध्यापक बी. एम. मधाळे यांनी, पर्यावरण प्रेमी शिक्षक नामदेव चौगुले यांच्या पर्यावरण कार्याचे कौतुक करून समाजाला दिशा देणारे असे कार्य प्रत्येकासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. कार्यक्रमास आर. एम. केसरकर, आय. एस. जबडे, ए. ए. टेंबुगडे,एस. एम. भोसले, आर. एस. गडकरी, वाय. पी. धोंडफोडे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
लॉरीच्या धडक बसून झाला  दुचाकीस्वाराचा मृत्यू ..!उगारमध्ये 2 कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचा शुभारंभ : खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी दिली चालनापर्यावरण संवर्धन ही सातत्याची सवय बनावी : प्रदीपकुमार इंडीमार्केट पोलिसांनी ड्रॅगन चाकू बाळगणाऱ्या युवकाला घेतले ताब्यात : मागील आठवड्यात घेतले होते चाकू-मुष्टी बाळगणाऱ्या युवकाला ताब्यात..!येळ्ळूर म.ए.समितीच्यावतीने दिनेश ओऊळकर यांचे अभिनंदन बेळगावात झालेल्या योग स्पर्धेत घेतला होता 180 हून अधिक स्पर्धकांनी भागउपस्थिती प्रणालीतील तांत्रिक अडचणी तातडीने दूर कराव्यात यासह अन्य मागण्यांचे शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदनपावसाने खचलेली इमारत पहाटेच्या सुमारास कोसळली ..!परिवहनला न्यायालयाचा मोठा दणका ..!   केकेआरटीसीची बस करण्यात आली जप्त ..!' आदित्यराज कॅपिटल्स ' मधील मनी लाँड्रिंगप्रकरणी 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल