LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

डीडीपीआय कार्यालयाला आले चक्क सायकलवरून ...!

मोदींच्या आवाहनाला सितारामु यांची साद

news_1779279731_0_702.webp

 

चिक्कोडी:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ' इंधन बचाव ' आवाहनाला साद देत चिक्कोडीचे जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयाला चक्क सायकलने आले.

 

 इंधनाचा काटकसरीने वापर करण्यासाठी खाजगी वाहनांना फाटा देण्याचे तसेच सार्वजनिक वाहतुकीचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकप्रतिनिधी तसेच सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केले होते. या आवाहनानुसार चिक्कोडीचे जिल्हा शिक्षणाधिकारी सीतारामू यांनी आपल्या सरकारी वाहनाला दूर ठेवत डीडीपीआय कार्यालयाला येण्यासाठी चक्क सायकलचा वापर चालविला आहे. ते आता दररोज सायकलवरून आपल्या कार्यालयात येत आहेत.

 

पंतप्रधान मोदी यांच्या इंधन वाचवा या आवाहनानुसार देशातील अनेक मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री तसेच विविध राज्यांतील नेते आणि अधिकारी हे कार्यालयीन कामकाजासाठी दुचाकी, मेट्रो आणि परिवहन महामंडळाच्या बसचा वापर करत असल्याचे दिसून येत आहे. त्याच धर्तीवर चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्याचे डीडीपीआय सीतारामू यांनीही सरकारी वाहनांचा वापर टाळत सायकलने प्रवास करण्याचा निर्णय घेऊन ते ये-जा करण्यासाठी सायकल वापरत आहेत. जागतिक इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर इंधनाची बचत करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी याबद्दल बोलताना म्हटले आहे. 

इतर सरकारी अधिकाऱ्यांनीही बस सेवा आणि सायकलचा वापर करून इंधन बचतीसnews_1779279731_0_702.webp

 

हातभार लावावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
नितीन शिंदे फायटर्स अरिहंत चषकाचा मानकरीजिल्हा इस्पितळात पूर्णवेळ डॉक्टर नियुक्त करावा डीडीपीआय कार्यालयाला आले चक्क सायकलवरून ...!सोलापूरच्या समर्थ क्रीडा फुटबॉल क्लबला नमवत बेळगावच्या मानस फुटबॉल अकादमीने पटकाविले विजेतेपदबेळगांवच्या स्केटिंगपटूनी केली 9 पदकांची कमाईमुलांवर वाचन संस्कार होणे गरजेचे : शिवाजी हसनेकर.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजय