LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

दैवज्ञ ज्वेलरी असोसिएशनने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट : केली कृतज्ञता व्यक्त ..!

बेळगाव : जिल्ह्यातील प्रामाणिक सराफ व्यावसायिकांच्या हितसंरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या जिल्हा जागृती समिती स्थापनेच्या ऐतिहासिक आदेशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दैवज्ञ ज्वेलरी असोसिएशन (एएम) शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांची सदिच्छा व कृतज्ञता भेट घेतली. बेळगाव दैवज्ञ ज्वेलरी असोसिएशन अध्यक्ष माणिक अणवेकर आणि सचिव वैभव वेर्णेकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने ही कृतज्ञता भेट घेतली.

सराफ व्यावसायिकांच्या हितसंरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेला जिल्हा जागृती समिती स्थापनेचा ऐतिहासिक आदेश प्रशंसनीय आहे. जुने सोने-चांदी तसेच वापरलेल्या दागिन्यांच्या खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये पारदर्शकता, कायदेशीरता आणि पोलीस विभाग व सराफ व्यावसायिक यांच्यात समन्वय निर्माण करण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय असल्याचे सांगत असोसिएशनने जिखाधिकाऱ्यांची मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली, 
तसेच आभार व्यक्त केले. 
हा आदेश जिल्ह्यातील सराफ व्यावसायिकांना मोठे संरक्षण देणारा असून जिल्हा प्रशासनाचा दूरदृष्टीचा आणि आदर्श निर्णय असल्याचेही असोसिएशनने नमूद केले.
यावेळी कर्नाटक सरकारच्या कामगार विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांअंतर्गत जिल्ह्यातील सुवर्णकारांना 1000 हून अधिक कामगार ओळखपत्रे मिळवून देण्यासाठी असोसिएशनने बजावलेल्या भूमिकेची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली. असोसिएशनतर्फे आमंत्रित करण्यात आलेल्या काही लाभार्थ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रतिकात्मक स्वरूपात कामगार ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले.
या उपक्रमाबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी दैवज्ञ ज्वेलरी असोसिएशनच्या समाजाभिमुख कार्याचे कौतुक करत सुवर्णकार आणि सराफ समाजाच्या कल्याणासाठी संघटना करत असलेल्या कार्याची प्रशंसा केली.
बैठकीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सुवर्णकार आणि सराफ व्यावसायिकांसाठी विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याचा सल्ला दिला. कर्नाटक सरकार व कामगार विभागाच्या विविध योजनांबाबत जागरूकता निर्माण करणे तसेच नव्याने स्थापन झालेल्या जिल्हा जागृती समितीचे उद्दिष्ट, अधिकार, जबाबदाऱ्या आणि व्यावसायिकांनी पाळावयाच्या कायदेशीर प्रक्रियांबाबत माहिती देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
जुने सोने आणि चांदीचे दागिने खरेदी करताना पाळावयाचे नियम व घ्यावयाची काळजी याबाबत व्यापाऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण झाल्यास चोरीच्या मालाच्या व्यवहारांपासून दूर राहण्यास मदत होईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी मत व्यक्त केले. यासाठी जिल्हास्तरीय भव्य जनजागृती कार्यक्रम लवकरात लवकर आयोजित करण्याचे आवाहन त्यांनी असोसिएशनला केले.
अध्यक्ष माणिक अणवेकर आणि सचिव वैभव वेर्णेकर यांनी हा कार्यक्रम लवकरात लवकर आयोजित करण्याचे आश्वासन दिले.
ही बैठक अत्यंत सौहार्दपूर्ण आणि फलदायी वातावरणात पार पडली. जिल्ह्यातील सराफ व्यावसायिक आणि सुवर्णकारांच्या हितसंरक्षण व विकासासाठी जिल्हा प्रशासन आणि दैवज्ञ ज्वेलरी असोसिएशन यांनी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
श्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती  होन्निहाळ येथील 'त्या' खून खटल्यात 6 ऑगस्टला सुनावण्यात येणार शिक्षा ?धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा युवकांचा विजय; लोकशाहीचा विजय असल्याचा सिद्धरामय्या यांचा दावाबायपाससाठी जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध; एकरी ₹5 कोटी भरपाईच्या मागणीसाठी 30 जुलैला चक्काजाम आंदोलनधावत्या बसमध्ये सुरू झाला वाद; विद्यार्थ्यांमध्ये बेल्ट, दगड आणि काठ्यांनी तुफान हाणामारी!सेवानिवृत्तीनिमित्त सविता चंदगडकर-निकम यांचा वेदांत-गुरुस्पंदनने केला सन्मान मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते खरीप पीकविमा योजनेच्या माहितीपत्रकाचे प्रकाशनराजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाईन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद :  1011 विद्यार्थ्यांनी घेतला होता स्पर्धेत सहभागभडगावजवळील पूल कोसळला :  गडहिंग्लज-नेसरी रस्ता बंद मुडलगीत पावसासाठी गाढवांचा विवाह :  निमंत्रणपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल