LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

परिवहनला न्यायालयाचा मोठा दणका ..!   केकेआरटीसीची बस करण्यात आली जप्त ..!

बिदर : बिदर न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. कल्याण कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (KKRTC) बस जप्त करण्याचे आदेश दिले. 

 अपघातात मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबाला नुकसानभरपाई देण्याचा आदेश  न्यायालयाने  कल्याण कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाला दिला होता. मात्र,  कल्याण कर्नाटक परिवहन बिदर डेपोने नुकसानभरपाई वेळेत न दिल्याने बिदर न्यायालयाने परिवहनला मोठा दणका देत महामंडळाची एक बस जप्त करण्याचा आदेश दिला. त्यान्वये बस जप्त करून न्यायालयीन आवारात आणून ठेवण्यात आली आहे..

15 ऑगस्ट 2021 रोजी भालकी तालुक्यातील टेकणी गावाजवळ भीषण रस्ता अपघात झाला होता. या अपघातात रेखा सुनील (वय 35) या महिलेचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला होता. त्यानंतर मृत महिलेच्या कुटुंबीयांनी नुकसानभरपाईसाठी न्यायालयात धाव घेतली होती.
या प्रकरणाची सुनावणी केल्यानंतर बिदर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने मृत महिलेच्या कुटुंबाला सुमारे 22.50 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा आदेश केकेआरटीसीला दिला होता. मात्र, न्यायालयाचा आदेश होऊन तब्बल सात महिने उलटूनही महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित कुटुंबाला नुकसानभरपाई अदा केली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी पुन्हा न्यायालयाचे दार ठोठावले.
न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे गंभीरपणे घेत न्यायाधीशांनी केकेआरटीसीची बस जप्त करण्याचे आदेश दिले. त्यानुसार अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत महामंडळाची बस जप्त करून ती बिदर न्यायालयाच्या आवारात आणून उभी करण्यात आली आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट मेरीज संघाला विजेतेपदशिनोळी परिसरात गणेशमूर्तींवर रंगकामाचा अखेरचा हात : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची लगबग; साडेतीनशेहून अधिक मूर्ती सज्जन्यू इंग्लिश स्कूल, मुतगे येथे पालक मेळावा उत्साहात संपन्नमंत्री सतीश जारकीहोळींवर ईडीचा छापा; निकटवर्तीयांच्या घरांवरही झडतीमेंढ्या राखताना तरुणावर मगरीचा हल्ला; पायाला गंभीर दुखापतबेळगावमध्ये उभारण्यात येणार आयटी पार्क : पालक मंत्र्यांनी दिली आराखडा तयार करण्याची सूचना अत्रिवरद मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद सेंटरचे प्रमुख चिकित्सक, वैद्य रुपेश साळुंखे यांना करण्यात आले  'कर्नाटक हेल्थकेअर वैद्यरत्न पुरस्काराने' सन्मानीतविद्याभारती राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेला प्रारंभ : बेळगाव, बळ्ळारी, हावेरी, बेंगळूर, म्हैसूर संघांचा उपांत्य फेरीत प्रवेशराज्य रँकिंग स्पर्धेत बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरीश्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती