LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

महागाईविरोधात काँग्रेसचे केंद्र सरकारविरोधात आंदोलन : पेटविल्या चुली 

news_1780141376_0_654.webp

 

बेळगाव : वाढत्या महागाईविरोधात काँग्रेसने आज चन्नम्मा चौकात केंद्र सरकारविरोधात आंदोलन छेडले.  आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी चुल पेटवून स्वयंपाक करत इंधन आणि स्वयंपाक गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्यांची होत असलेली होरपळ केंद्रास दाखवून दिली. 

वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक, गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबे आर्थिक संकटात सापडली असल्याचा आरोप करत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने केली.

दररोज पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या किमती वाढत असून त्याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. महागाई नियंत्रणात आणण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याचा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी केला.
स्वयंपाक गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती तातडीने कमी करून जनतेला दिलासा द्यावा. अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला.

या आंदोलनात बेळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, आयिषा सनदी, मंजुनाथ कांबळे, मोहन रेड्डी यांच्यासह जिल्हा काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध आघाड्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट मेरीज संघाला विजेतेपदशिनोळी परिसरात गणेशमूर्तींवर रंगकामाचा अखेरचा हात : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची लगबग; साडेतीनशेहून अधिक मूर्ती सज्जन्यू इंग्लिश स्कूल, मुतगे येथे पालक मेळावा उत्साहात संपन्नमंत्री सतीश जारकीहोळींवर ईडीचा छापा; निकटवर्तीयांच्या घरांवरही झडतीमेंढ्या राखताना तरुणावर मगरीचा हल्ला; पायाला गंभीर दुखापतबेळगावमध्ये उभारण्यात येणार आयटी पार्क : पालक मंत्र्यांनी दिली आराखडा तयार करण्याची सूचना अत्रिवरद मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद सेंटरचे प्रमुख चिकित्सक, वैद्य रुपेश साळुंखे यांना करण्यात आले  'कर्नाटक हेल्थकेअर वैद्यरत्न पुरस्काराने' सन्मानीतविद्याभारती राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेला प्रारंभ : बेळगाव, बळ्ळारी, हावेरी, बेंगळूर, म्हैसूर संघांचा उपांत्य फेरीत प्रवेशराज्य रँकिंग स्पर्धेत बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरीश्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती