LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

कुडचीत शिक्षकांसाठी योग प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

कुडची  : ' प्रत्येकाने योग, ध्यान आणि प्राणायामाचा अवलंब करून तसेच शिस्तबद्ध आहारपद्धती अंगीकारून अनेक आजारांपासून दूर राहून सुदृढ शरीर मिळवू शकतो ',असे मत रायबागचे गट शिक्षणाधिकारी आर. बसवराजप्पा यांनी व्यक्त केले.

कुडची येथील अजित बाने कन्नड व नवीन माध्यमिक विद्यालयात क्षेत्र शिक्षणाधिकारी कार्यालय, चिक्कोडी शैक्षणिक जिल्हा आणि आयुष विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एकदिवसीय योग प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन रोपाला पाणी घालून करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
बसवराजप्पा म्हणाले, "विद्यार्थ्यांना योग आणि योग्य आहारपद्धतीचे महत्त्व समजावून सांगून त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील योगपटू म्हणून घडविण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत."
यावेळी तालुका शारीरिक शिक्षण पर्यवेक्षक महावीर जिरग्याळ, डॉ. एस. जी. दानोळी, डॉ. आरती, डॉ. विजयलक्ष्मी श्रीधर मोरबद, डॉ. उमेश होनकांबळे, डॉ. सुमित पुजारी, अंबिका कांबळे, प्रशासकीय अधिकारी ए. एस. टोनणे, मुख्याध्यापक एस. पी. कांबळे तसेच एस. एम. जमादार, झेड. आर. मुल्ला, बी. एस. अंदानी, एम. डी. बनाज, व्ही. डी. आदी उपस्थित होते.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट मेरीज संघाला विजेतेपदशिनोळी परिसरात गणेशमूर्तींवर रंगकामाचा अखेरचा हात : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची लगबग; साडेतीनशेहून अधिक मूर्ती सज्जन्यू इंग्लिश स्कूल, मुतगे येथे पालक मेळावा उत्साहात संपन्नमंत्री सतीश जारकीहोळींवर ईडीचा छापा; निकटवर्तीयांच्या घरांवरही झडतीमेंढ्या राखताना तरुणावर मगरीचा हल्ला; पायाला गंभीर दुखापतबेळगावमध्ये उभारण्यात येणार आयटी पार्क : पालक मंत्र्यांनी दिली आराखडा तयार करण्याची सूचना अत्रिवरद मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद सेंटरचे प्रमुख चिकित्सक, वैद्य रुपेश साळुंखे यांना करण्यात आले  'कर्नाटक हेल्थकेअर वैद्यरत्न पुरस्काराने' सन्मानीतविद्याभारती राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेला प्रारंभ : बेळगाव, बळ्ळारी, हावेरी, बेंगळूर, म्हैसूर संघांचा उपांत्य फेरीत प्रवेशराज्य रँकिंग स्पर्धेत बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरीश्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती