LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

मुदतीत विशेष मतदार यादी पुनरावलोकन पूर्ण करा : आयुक्त कार्तिक एम यांची सूचना

बेळगाव : निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार बेळगाव महानगरपालिका हद्दीत विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरावलोकन (SIR) सुरू करण्यात आले असून हे काम निर्धारित मुदतीत पूर्ण करावे, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त कार्तिक एम यांनी निवडणूक विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले.

सोमवारी महापालिका कार्यालयात आयोजित आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी बोलताना त्यांनी आतापर्यंत झालेल्या कामाची माहिती घेतली आणि आवश्यक सूचना केल्या.
महापालिका हद्दीत उत्तर व दक्षिण असे दोन विभाग असून, कार्तिक एम हे निवडणूक नोंदणी अधिकारी (Returning Officer) म्हणून कार्यरत आहेत. तर महसूल विभागाचे उपआयुक्त डॉ. ए. के. गुप्ता यांची सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकारी (Assistant Returning Officer) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
महापालिकेचे प्रशासन उपआयुक्त उदयकुमार तलवार यांचीही निवडणूक नोंदणी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून लक्ष्मी निप्पाणीकर यांची सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
उत्तर आणि दक्षिण विभाग मिळून एकूण 514मतदान केंद्र अधिकारी 40 पर्यवेक्षकांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहेत. आतापर्यंत उत्तर विभागात 72.02 टक्के, तर दक्षिण विभागात 82.66 टक्के मॅपिंगचे काम पूर्ण झाले असून सुमारे 90 टक्के उद्दिष्ट साध्य करण्यात आले आहे.
संबंधित स्तरावरील अधिकारी आणि कर्मचारी 30 तारखेपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणार असल्याची माहितीही आयुक्त कार्तिक एम यांनी दिली.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
श्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती  होन्निहाळ येथील 'त्या' खून खटल्यात 6 ऑगस्टला सुनावण्यात येणार शिक्षा ?धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा युवकांचा विजय; लोकशाहीचा विजय असल्याचा सिद्धरामय्या यांचा दावाबायपाससाठी जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध; एकरी ₹5 कोटी भरपाईच्या मागणीसाठी 30 जुलैला चक्काजाम आंदोलनधावत्या बसमध्ये सुरू झाला वाद; विद्यार्थ्यांमध्ये बेल्ट, दगड आणि काठ्यांनी तुफान हाणामारी!सेवानिवृत्तीनिमित्त सविता चंदगडकर-निकम यांचा वेदांत-गुरुस्पंदनने केला सन्मान मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते खरीप पीकविमा योजनेच्या माहितीपत्रकाचे प्रकाशनराजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाईन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद :  1011 विद्यार्थ्यांनी घेतला होता स्पर्धेत सहभागभडगावजवळील पूल कोसळला :  गडहिंग्लज-नेसरी रस्ता बंद मुडलगीत पावसासाठी गाढवांचा विवाह :  निमंत्रणपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल