LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सहकुटुंब घेतले यल्लम्मा देवीचे दर्शन 

बेळगाव :  बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन (Mohammad Roshan) यांनी आपल्या कुटुंबासह श्री यल्लम्मा देवीचे दर्शन घेतले.
यल्लम्मा गडाच्या विकासासाठी सुमारे 215 कोटी रुपयांच्या विकासकामांच्या निविदेला मंजुरी मिळाली आहे. ही कामे लवकरच सुरू करण्यात येणार असून, सुमारे 11 महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, असे मोहम्मद रोशन यांनी यल्लम्मा देवीच्या दर्शनानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
भक्तांना आवश्यक त्या सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजित प्रकल्प वेळेत पूर्ण केला जाईल. विकास आराखडा तयार असून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आपली कन्या रूही हिच्या जन्मानिमित्त कुटुंबासह यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी आलो असल्याचे सांगताना जिल्हाधिकारी रोशन म्हणाले की, हे जागृत आणि पवित्र तीर्थक्षेत्र आहे.
यावेळी त्यांच्या पत्नी अंकिता, यल्लम्मा मंदिर विकास प्राधिकरणाच्या सचिव प्रभावती फकीरपूर, अयान, रूही, मदू, सौंदत्ती नगरपालिकेचे आयुक्त संगनबसय्या, मल्लू जकाती, अल्लमप्रभू प्रभुनवर, मंजुनाथ अंगडी, अमीन गोरिनाई, प्रभू हंजगी, सदानंद ईटी, जगदनगौडा पोलेशी, मंजुनाथगौडा संधिमनी, पंडित यडूरय्या तसेच मंदिराचे कर्मचारी उपस्थित होते.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सहकुटुंब घेतले यल्लम्मा देवीचे दर्शन सावधान..! समाज माध्यमांवर आहे पोलिसांची करडी नजर ....!!शिवबसवज्योती मध्ये रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसादआईसोबत खेळत असलेल्या दीड वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यूफार्मसी विद्यार्थ्यांचे परिक्षेत सुयश : ऐश्वर्या हवले यांनी दिली आहे माहिती पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यूमंत्री जारकीहोळी यांचा लवकरच निपाणी भागाचा दौरा चुलते, आमदार परिषदेचे सदस्य लखन जारकीहोळी यांच्या वाढदिवसानिमित्त राहुल जारकीहोळींकडून शुभेच्छाबेळगावात  एकाच वेळी केले 1,000 केले विश्वगुरू बसवण्णांच्या 34 वचनांचे गायन' त्या ' थरारनाट्य प्रकरणात चौघांना अटक