LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

अंत्यसंस्कारावेळी हाणामारी :  दोघे गंभीर जखमी

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील रायबाग शहरात अंत्यसंस्कारावेळी झालेल्या वादाला रक्तरंजित वळण लागले. मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांवरच जावई व त्याच्या साथीदारांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे.
संतोष भोसले नामक व्यक्तीचे निधन झाल्याने कुटुंबीय अंत्यसंस्काराच्या तयारीत व्यस्त होते.
यावेळी कुटुंबातील जावई अभिषेक रवी माने, नंदू रवी माने (बेळगाव) तसेच इचलकरंजीचा आकाश माने, ओंकार भिसे तसेच काही महिला व इतर साथीदारांनी कुटुंबीयांवर हल्ला केला. वाद चिघळल्यानंतर आरोपींनी लाकडी दांडक्यांनी मारहाण केली. या हल्ल्यात काही जणांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे. घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना रायबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
या हाणामारीमागील नेमके कारण समजू शकले नाही. मात्र, अंत्यसंस्कारावेळी झालेल्या या जीवघेण्या हल्ल्याची रायबाग शहरात चर्चा  आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्याने लखन जारकीहोळी नाराज : म्हणाले, ' ही चूक काँग्रेसला महागात पडेल ' अंत्यसंस्कारावेळी हाणामारी :  दोघे गंभीर जखमीसतीश जारकीहोळी यांच्यासमोर नवा पेच ?  : प्रदेशाध्यक्ष की मंत्री ? : राजकीय समीकरणांनाना मिळणार नवे वळण : काँग्रेस गोटात आलंय चर्चेला उधाणआणि सिद्धरामय्या समर्थकाने केला विष प्राशनाचा प्रयत्न ...! सिद्धरामय्या राजीनामा पडसाद पोहोचले थेट यादगीरपर्यंत ...!!पोस्टमास्टर एस पी कांबळे यांना सेवानिवृत्तीनिमित्त निरोपदोघांनी डोक्यात दगड घालून केला मित्राचाच खून भीषण अपघातात एकाचा मृत्यू : तिघे गंभीर जखमीनिपाणीत चाबूक मोर्चा :  पाटबंधारे कार्यालयाला ठोकले टाळे ; आश्वासनानंतर आंदोलन मागे अखेर नेतृत्व बदलाच्या नाट्यावर पडला पडदा : सिद्धरामय्या यांनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा पावसाच्या अंदाज आता  आधुनिक साधनांवर : पावसाच्या अंदाजाच्या जुन्या पद्धती पावताहेत लोप