LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

शाळा, अंगणवाड्यांतील मूलभूत सुविधा तपासा : जि.पं. सीईओ राहुल शिंदे यांची सूचना

राहुल शिंदे म्हणाले, 'एकही मूल शाळेबाहेर राहता कामा नये '

 बेळगाव : शाळा व अंगणवाड्या पुन्हा सुरू होत असल्याने जिल्ह्यातील सर्व शाळा व अंगणवाड्यांमधील मूलभूत सुविधांची संबंधित अधिकाऱ्यांनी तपासणी करून आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी दिले आहेत.

शाळा व अंगणवाड्यांच्या परिसरात स्वच्छतेस प्राधान्य द्यावे. अन्नसाठा कक्ष स्वच्छ ठेवावा. अन्नपदार्थांची गुणवत्ता तपासावी. पिण्याचे पाणी, वीज यांसह इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे त्यांनी सांगितले आहे. 

सर्व ग्रामपंचायत, स्थानिक संस्था व महानगरपालिका क्षेत्रातील शाळा व अंगणवाड्यांच्या इमारतींची पावसाळ्यापूर्वी तपासणी करावी. गरज भासल्यास शाळा-अंगणवाड्यापर्यायी इमारतींमध्ये स्थलांतराची व्यवस्था कराव्यात. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावेत, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.
शाळा व अंगणवाड्यांना पुरविण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याची एफ.टी.के. किटद्वारे तपासणी करूनच पाणी पुरवठा करावा. परिसरातील धोकादायक विद्युत तारा  तातडीने स्थलांतरित कराव्यात, असेही त्यांनी सांगितले आहे.

दिनांक 1 जून रोजी सर्व शाळांमध्ये प्रारंभोत्सव उत्साहात साजरा करावा. एकही विद्यार्थी शाळेबाहेर राहू नये यासाठी प्रयत्न करावेत. शाळाबाह्य विद्यार्थ्यांना समजावून सांगून पुन्हा शाळेत आणावे. अंगणवाड्यांमध्ये दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी आणि शाळांमध्ये चौथ्या शनिवारी पालकसभा घेणे बंधनकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सर्व वसतिगृहांमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे. सुरक्षा रक्षक व सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. यावर्षीही संध्याकाळी विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वर्ग आयोजित करावेत, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.

शाळा, अंगणवाड्या व शासकीय कार्यालयांमध्ये वृक्षारोपण करून वनमहोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करावा. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

 जिल्हा पंचायत नियोजन संचालक रवी बंगारेप्पनवर, उपसचिव (विकास) बसवराज अडविमठ, नगरविकास विभागाचे नियोजन संचालक मल्लिकार्जुन कलादगी यांच्यासह विविध विभागांच्या जिल्हा व तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या आहेत.

#jilhapanchaytceo
#ceorahulshinde
#anganvadi
#school
#bn7news

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
शांतिनिकेतन, संत मीरा,  देवेंद्र जीनगौडाने कब्बडी स्पर्धेत गाठली अंतिम फेरीजिल्हाधिकाऱ्यांनी केले उपमुख्यमंत्र्यांचे स्वागतराखेने भरलेला ट्रक विजेच्या खांबावर आदळून झाला पलटीपाणी पुरवठा विभागाने घेतली BN7 NEWS च्या वृत्ताची दखल : अवघ्या 8 तासात केली ' त्या ' जलवाहिनीची दुरुस्ती शिवराज्याभिषेक सोहळा : ज्ञानमंदिर बनले होते शिवमयविजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यूश्री मारुती नगरला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी विद्याभारती जिल्हास्तरीय शैक्षणिक संमेल्लन उत्साहात.गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 10 लाखांची शिष्यवृत्ती : पोतदार एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम132 जणांनी केले रक्तदान : रक्तदात्यांना 1 लाखांचा विमा :  राष्ट्रीय बसव दलाचा आदर्श उपक्रम