LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

हार्ट अटॅकने बॉडीबिल्डरचा मृत्यू

दावणगेरे :  हृदयविकाराच्या झटक्याने एका शरीरसौष्ठवपटूचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दावणगेरे येथे घडली.

 सुशील कुमार (वय 26, राहणार : केटीसी नगर) असे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या शरीरसौष्ठवपटूचे नाव आहे. 
सुशील कुमार हे बॉडीबिल्डिंग क्षेत्रात सक्रिय होते. त्यांनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये भाग घेत अनेक पुरस्कार पटकावले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी जिममधील व्यायाम पूर्ण करून घरी परतल्यानंतर ते अचानक कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
सुदृढ आणि तंदुरुस्त म्हणून ओळख असलेल्या सुशील कुमार यांच्या आकस्मिक निधनाने कुटुंबीयांसह मित्रपरिवार आणि क्रीडा क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
श्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती  होन्निहाळ येथील 'त्या' खून खटल्यात 6 ऑगस्टला सुनावण्यात येणार शिक्षा ?धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा युवकांचा विजय; लोकशाहीचा विजय असल्याचा सिद्धरामय्या यांचा दावाबायपाससाठी जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध; एकरी ₹5 कोटी भरपाईच्या मागणीसाठी 30 जुलैला चक्काजाम आंदोलनधावत्या बसमध्ये सुरू झाला वाद; विद्यार्थ्यांमध्ये बेल्ट, दगड आणि काठ्यांनी तुफान हाणामारी!सेवानिवृत्तीनिमित्त सविता चंदगडकर-निकम यांचा वेदांत-गुरुस्पंदनने केला सन्मान मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते खरीप पीकविमा योजनेच्या माहितीपत्रकाचे प्रकाशनराजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाईन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद :  1011 विद्यार्थ्यांनी घेतला होता स्पर्धेत सहभागभडगावजवळील पूल कोसळला :  गडहिंग्लज-नेसरी रस्ता बंद मुडलगीत पावसासाठी गाढवांचा विवाह :  निमंत्रणपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल