LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

40 फूट दरीत दुचाकी कोसळली :  दाम्पत्याची सुखरूप सुटका

सौंदत्ती : येथील यल्लम्मा डोंगर  मार्गावरील स्पिनिंग मिलजवळ दुचाकी घसरून सुमारे 40 फूट खोल दरीत कोसळली. त्या दुचाकीवरील दाम्पत्य देखील दुचाकीबरोबर त्या दरीत कोसळले. पण, अग्निशामक व आपत्कालीन सेवा विभागाच्या जवानांनी तत्काळ बचावकार्य करून त्या दोघांची सुखरूप सुटका केली.

पवनकुमार नायक (30) आणि  अर्पिता नायक  (23), रा. उणकल, हुबळी अशी सुखरूप सुटका करण्यात आलेल्या त्या दाम्पत्याची नावे आहेत. 
हे दाम्पत्य यल्लम्मा देवीचे दर्शन घेऊन परतत असताना त्यांच्या दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने वाहन थेट दरीत कोसळले.
दरीच्या तळाशी असलेल्या दाट झुडपांमुळे आणि वनस्पतींमुळे दोघांचाही जीव वाचला. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी दोघांना खांद्यावरून उचलून सुरक्षित बाहेर आणले.
प्राथमिक उपचारांसाठी त्यांना तालुका रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारांसाठी त्यांना हुबळीतील किम्स इस्पितळ (KIMS Hospital)  येथे हलविण्यात आले.
या बचाव मोहिमेत सुनील तेलागर, अशोक रुद्रगौडर, जंगलीसाब दोडमणी, आनंद हिडकल्ल, मंजुनाथ मडिवाळर आणि आर. नवीनकुमार यांनी सहभाग घेतला.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट मेरीज संघाला विजेतेपदशिनोळी परिसरात गणेशमूर्तींवर रंगकामाचा अखेरचा हात : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची लगबग; साडेतीनशेहून अधिक मूर्ती सज्जन्यू इंग्लिश स्कूल, मुतगे येथे पालक मेळावा उत्साहात संपन्नमंत्री सतीश जारकीहोळींवर ईडीचा छापा; निकटवर्तीयांच्या घरांवरही झडतीमेंढ्या राखताना तरुणावर मगरीचा हल्ला; पायाला गंभीर दुखापतबेळगावमध्ये उभारण्यात येणार आयटी पार्क : पालक मंत्र्यांनी दिली आराखडा तयार करण्याची सूचना अत्रिवरद मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद सेंटरचे प्रमुख चिकित्सक, वैद्य रुपेश साळुंखे यांना करण्यात आले  'कर्नाटक हेल्थकेअर वैद्यरत्न पुरस्काराने' सन्मानीतविद्याभारती राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेला प्रारंभ : बेळगाव, बळ्ळारी, हावेरी, बेंगळूर, म्हैसूर संघांचा उपांत्य फेरीत प्रवेशराज्य रँकिंग स्पर्धेत बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरीश्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती