LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

सुळगा (हिं.) येथे श्री जोतिबा व काळभैरव मंदिराचे भूमिपूजन

बेळगाव : सुळगा ( हिंडलगा) येथे काल गुरुवारी श्री. जोतिबा व काळभैरव मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडला.
यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवस्की पंच कमिटीचे अध्यक्ष श्री. भावकू भैरु पाटील हे होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून ग्राम सुधारणा कमिटी अध्यक्ष श्री.परशराम फकिरा पाटील, बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष श्री. आर. एम. चौगुलेव्यावसायिक श्री. जोतिबा रामा पाटील, सामाजिक कार्यकर्ते श्री. महेशकुमार धाकलु कांबळे उपस्थित होते.



प्रारंभी विक्रम जोतिबा जाधव यांनी प्रास्ताविक केले. गुलाबपुष्प देऊन उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी श्री.आर.एम.चौगुले यांच्या हस्ते श्री गणेश फोटोपूजन, श्री.जोतिबा रामा पाटील यांच्या हस्ते श्री जोतिबा फोटोपूजन, गुरुप्रसाद इंजिनिअरिंग वर्कस शिनोळी संचालक श्री. दिपक मल्लाप्पा पाटील यांच्या हस्ते श्री काळभैरव फोटोपूजन, सामाजिक कार्यकर्ते श्री. दीपक गंगाराम कांबळे यांच्या हस्ते सरस्वती फोटोपूजन आणि बालाजी सोसायटी सुळगा (हिं.) संस्थेचे चेअरमन श्री.मनोज नारायण कलखांबकर यांच्या हस्ते छ. शिवाजी महाराज फोटोपूजन करण्यात आले. तर उचगाव ग्रामपंचायत माजी अध्यक्ष श्री. विनोद गोपाळ पावशे यांनी श्रीफळ वाढविले.
यानंतर गव्ह.कॉन्ट्रॅक्टर श्री.सोमनाथ सिद्राय कांबळे, ता. पं. सदस्य श्री. नारायण लक्ष्मण कदम, साईराम सोसायटी सुळगा (हिं.) संस्थापक श्री. काशीराम ओमाण्णा पाटील, साईराम सोसायटी सुळगा (हिं.) या संस्थेचे चेअरमन श्री. मारुती सोमाण्णा पाटील, बालाजी सोसायटी सुळगा (हिं.) संस्थेचे चेअरमन श्री. मनोज नारायण कलखांबकर, श्री ब्रह्मलिंग को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. सुळगा (हिं.) या संस्थेचे चेअरमन श्री. प्रकाश महादेव पाटील यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन तसेच श्री. महादेव पिराजी पाटील देवस्की (पंच कमिटी उपाध्यक्ष), तसेच देवस्की पंच कमिटीचे सदस्य श्री. यल्लाप्पा रवळू कदम, श्री. लक्ष्मण चुडाप्पा कोवाडकर, श्री. परशराम यल्लाप्पा पाटील, श्री. लक्ष्मण गणू चौगुले, श्री. बाळू लक्ष्मण देवगेकर, श्री.बाळू कांबळे (कोलकार) यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले.


याप्रसंगी श्री.आर.एम.चौगुले, श्री.प्रकाश महादेव पाटील यांनी आपले विचार मांडल्यानंतर श्री. भावकू भैरू पाटील यांचे अध्यक्षीय भाषण झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रम जोतिबा जाधव व रोहन पाटील यांनी केले. तर आभार विक्रम जोतिबा जाधव यांनी मानले.
या कार्यक्रमाला गावातील सर्व युवक मंडळे, युवा वर्ग, भजनी मंडळे, माता-भगिनी, बाळ गोपाळ व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
शांतिनिकेतन, संत मीरा,  देवेंद्र जीनगौडाने कब्बडी स्पर्धेत गाठली अंतिम फेरीजिल्हाधिकाऱ्यांनी केले उपमुख्यमंत्र्यांचे स्वागतराखेने भरलेला ट्रक विजेच्या खांबावर आदळून झाला पलटीपाणी पुरवठा विभागाने घेतली BN7 NEWS च्या वृत्ताची दखल : अवघ्या 8 तासात केली ' त्या ' जलवाहिनीची दुरुस्ती शिवराज्याभिषेक सोहळा : ज्ञानमंदिर बनले होते शिवमयविजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यूश्री मारुती नगरला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी विद्याभारती जिल्हास्तरीय शैक्षणिक संमेल्लन उत्साहात.गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 10 लाखांची शिष्यवृत्ती : पोतदार एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम132 जणांनी केले रक्तदान : रक्तदात्यांना 1 लाखांचा विमा :  राष्ट्रीय बसव दलाचा आदर्श उपक्रम