LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

बेळगाव :  सीपीआय श्रीशैल चौगले यांनी केली आत्महत्या

बेळगाव : राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (SDRF) सीपीआय पदावर कार्यरत असलेले श्रीशैल चौगले (वय 37) यांनी गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी उघडकीस आली आहे.

शहरातील चन्नम्मानगर येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. गुरुवारी पहाटे त्यांच्या खोलीचा दरवाजा आतून बंद असल्याचे लक्षात आल्यानंतर पत्नीला संशय आला. त्यांनी तात्काळ एसडीआरएफ कर्मचाऱ्यांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि दरवाजा तोडून चौगले यांना बाहेर काढले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
 श्रीशैल चौगले यांनी आत्महत्या का केली याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. या अचानक घडलेल्या घटनेमुळे कुटुंबीय, सहकारी आणि मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे. मृतदेह पुढील शवविच्छेदनासाठी बिम्स रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला आहे.
या प्रकरणी उद्यमगबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
शांतिनिकेतन, संत मीरा,  देवेंद्र जीनगौडाने कब्बडी स्पर्धेत गाठली अंतिम फेरीजिल्हाधिकाऱ्यांनी केले उपमुख्यमंत्र्यांचे स्वागतराखेने भरलेला ट्रक विजेच्या खांबावर आदळून झाला पलटीपाणी पुरवठा विभागाने घेतली BN7 NEWS च्या वृत्ताची दखल : अवघ्या 8 तासात केली ' त्या ' जलवाहिनीची दुरुस्ती शिवराज्याभिषेक सोहळा : ज्ञानमंदिर बनले होते शिवमयविजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यूश्री मारुती नगरला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी विद्याभारती जिल्हास्तरीय शैक्षणिक संमेल्लन उत्साहात.गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 10 लाखांची शिष्यवृत्ती : पोतदार एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम132 जणांनी केले रक्तदान : रक्तदात्यांना 1 लाखांचा विमा :  राष्ट्रीय बसव दलाचा आदर्श उपक्रम