LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

बेळगावकरांनो सावधान ...! वाहतूक नियमभंगावर आहे, आता एआयची नजर ...!!

बेळगाव : रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती करूनही दरवर्षी हजारो नागरिकांना अपघातांमध्ये जीव गमवावा लागत आहे. या गंभीर समस्येला आळा घालण्यासाठी बेळगाव जिल्हा पोलिसांनी आता कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा आधार घेतला आहे.

वाहतूक नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी बेळगाव शहर व जिल्हा पोलिसांनी एआय-आधारित निगरानी (सर्वेलन्स) प्रणाली सुरू केली आहे. जिल्ह्यातील 145 ठिकाणी एकूण 290 एआय कॅमेरे बसविण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात 30 कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांच्या मदतीने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना स्वयंचलित पद्धतीने दंडाची नोटीस पाठविण्यात येणार आहे.
जिल्ह्यात गेल्या वर्षी 2,052 रस्ते अपघात झाले होते. त्यामध्ये 805 जणांचा मृत्यू झाला होता. यंदा 8 जूनपर्यंत 1,017 अपघातांमध्ये 367 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. सरासरी दरवर्षी 900 हून अधिक नागरिकांचा रस्ते अपघातांमध्ये मृत्यू होत असून, 3 हजारांहून अधिक जण गंभीर जखमी होतात.
या दुर्घटनांना आळा घालण्यासाठी एआय-आधारित कॅमेरे हेल्मेट न वापरणे, अतिवेगाने वाहन चालविणे, बेदरकार वाहनचालक आणि इतर वाहतूक नियमभंगाच्या घटनांवर सतत लक्ष ठेवत आहेत. दररोज हजारो उल्लंघनांची नोंद या प्रणालीद्वारे होत आहे.
वाहतूक नियंत्रणाबरोबरच हे एआय कॅमेरे गुन्हेगारी हालचालींवरही करडी नजर ठेवत आहेत. या संपूर्ण यंत्रणेच्या देखरेखीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक (एसपी) कार्यालयात विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
दंडाची रक्कम न भरणाऱ्या वाहनधारकांना नोटिसा पाठविण्याबरोबरच त्यांच्या घरी जाऊन वसुली करण्याची कारवाईही केली जात आहे. तसेच थकीत दंड असलेल्या वाहनांचा शोध घेऊन ती जप्त करण्याची मोहिमही पोलिसांकडून राबविली जात आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
माजी सैनिक हत्या प्रकरणात एफएसएल अधिकाऱ्यांचा  सहभाग ...? मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याविरोधातील अवमानकारक वक्तव्याचा निषेध :  रासिंगे यांच्या हकालपट्टीची दलित नेत्यांनी केलीय  मागणीबेळगावकरांनो सावधान ...! वाहतूक नियमभंगावर आहे, आता एआयची नजर ...!!हेल्मेट नसल्यास आता मिळणार नाही पेट्रोल ...? हेल्मेट जनजागृतीसाठी अनोखा प्रयोग :  हेल्मेट नसल्यास पेट्रोल न देण्याचे बेळगाव पोलिसांनी केलंय आवाहन ..!मधुमेहाबाबत अनावश्यक भीती बाळगू नका : डॉ. संदीप श्रीवास्तवभूमी वात्सल्य फाऊंडेशनतर्फे शैक्षणिक साहित्य वाटपासह करण्यात आले वृक्षारोपण'रवळनाथ' हौसिंग फायनान्सच्या सेवकांना सुधारित वेतन लागू :  संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांनी दिली माहितीबोरगाव सर्कल रुंदीकरण कामात दुजाभाव अधिकारी, लोकप्रतिनिधीसहस्थानिक नेत्यांनी लक्ष देण्याची मागणी जुगार अड्ड्यावर छापा :  20 जण अटकेतबँकॉकहून आणण्यात आलेला 13.14 कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा कस्टमकडून जप्त : सहा जणांना अटक