LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

सावधान..! समाज माध्यमांवर आहे पोलिसांची करडी नजर ....!!

बेळगाव : सावधान..! समाज माध्यमांवर आहे पोलिसांची करडी नजर. आक्षेपार्ह, चिथावणीखोर किंवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणारे मजकूर, व्हिडिओ आणि बातम्या समाज माध्यमांवर प्रसारित कराल तर पोलिसांच्या कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल बरं का.

तसा ईशारा पोलिस विभागाने दिला आहे.

सोशल मीडियावर आक्षेपार्ह, चिथावणीखोर किंवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणारे मजकूर, व्हिडिओ आणि पोस्ट प्रसारित करणाऱ्यांवर आता बेलगाव जिल्हा पोलिसांची करडी नजर राहणार आहे. यासाठी जिल्हा पोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज 24 तास कार्यरत सायबर सेल सुरू केला आहे.
सायबर सेलचे पथक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. विशेषतः गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले सराईत गुन्हेगार (राऊडी शीटर्स) धमकीचे व्हिडिओ, आक्षेपार्ह संवाद किंवा दहशत निर्माण करणारे संदेश प्रसारित करत असल्यास त्यांच्यावर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिस विभागाने दिला आहे.
पोलिसांच्या तांत्रिक देखरेख व्यवस्थेमुळे संशयास्पद स्टेटस, व्हायरल व्हिडिओ आणि भडकावू पोस्ट सहजपणे शोधता येत आहेत. सायबर सेल चोवीस तास कार्यरत असल्याने नागरिकांनीही अशा प्रकारच्या संशयास्पद पोस्ट किंवा संदेशांची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, केवळ अशा पोस्ट तयार करणाऱ्यांवरच नव्हे तर खोट्या बातम्या, अफवा किंवा द्वेषपूर्ण संदेश पुढे पाठविणाऱ्या व्यक्तींवरही कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा स्पष्ट ईशारा पोलिसांनी दिला आहे.
सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करा, अन्यथा कायद्याचा बडगा बसू शकतो, असा संदेश बेळगाव पोलिसांनी नागरिकांना दिला आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सहकुटुंब घेतले यल्लम्मा देवीचे दर्शन सावधान..! समाज माध्यमांवर आहे पोलिसांची करडी नजर ....!!शिवबसवज्योती मध्ये रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसादआईसोबत खेळत असलेल्या दीड वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यूफार्मसी विद्यार्थ्यांचे परिक्षेत सुयश : ऐश्वर्या हवले यांनी दिली आहे माहिती पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यूमंत्री जारकीहोळी यांचा लवकरच निपाणी भागाचा दौरा चुलते, आमदार परिषदेचे सदस्य लखन जारकीहोळी यांच्या वाढदिवसानिमित्त राहुल जारकीहोळींकडून शुभेच्छाबेळगावात  एकाच वेळी केले 1,000 केले विश्वगुरू बसवण्णांच्या 34 वचनांचे गायन' त्या ' थरारनाट्य प्रकरणात चौघांना अटक