LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

जागतिक पर्यावरण दिनी राणी चन्नम्मा विद्यापीठात जनजागृती कार्यक्रम

बेळगाव : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बेळगाव येथील राणी चन्नम्मा विद्यापीठामध्ये (Rani Channamma University) विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यापीठाचे मूल्यांकन कुलसचिव प्रा. डी. एन. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रा. पाटील यांनी पर्यावरण संवर्धनामध्ये युवकांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. सध्याच्या वाढत्या जागतिक तापमानाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण प्रदूषणामुळे मानवी आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात वन विभागाचे क्षेत्रीय वन अधिकारी शिवानंद माळी यांनीही सहभाग घेतला. त्यांनी पर्यावरण संरक्षणाच्या विविध उपाययोजना तसेच वनसंवर्धनासंदर्भातील शासनाच्या धोरणांची माहिती विद्यापीठातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना दिली.
विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक प्रा. वाय. एस. बळवंतगोळ यांनी उपस्थितांचे स्वागत केले. विद्यापीठाचे एनएसएस समन्वयक डॉ. कनकप्पा पुजार यांनी आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमात विद्यापीठातील विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
श्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती  होन्निहाळ येथील 'त्या' खून खटल्यात 6 ऑगस्टला सुनावण्यात येणार शिक्षा ?धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा युवकांचा विजय; लोकशाहीचा विजय असल्याचा सिद्धरामय्या यांचा दावाबायपाससाठी जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध; एकरी ₹5 कोटी भरपाईच्या मागणीसाठी 30 जुलैला चक्काजाम आंदोलनधावत्या बसमध्ये सुरू झाला वाद; विद्यार्थ्यांमध्ये बेल्ट, दगड आणि काठ्यांनी तुफान हाणामारी!सेवानिवृत्तीनिमित्त सविता चंदगडकर-निकम यांचा वेदांत-गुरुस्पंदनने केला सन्मान मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते खरीप पीकविमा योजनेच्या माहितीपत्रकाचे प्रकाशनराजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाईन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद :  1011 विद्यार्थ्यांनी घेतला होता स्पर्धेत सहभागभडगावजवळील पूल कोसळला :  गडहिंग्लज-नेसरी रस्ता बंद मुडलगीत पावसासाठी गाढवांचा विवाह :  निमंत्रणपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल