LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

श्रीशिवबसव ज्योती कॉलेजतर्फे स्वच्छता विषयक जागृती अभियान

बेळगाव : आधार शिक्षण संस्था संचालित श्री शिवबसव ज्योती होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज यांच्यावतीने स्वच्छता आणि आरोग्य जागृती विषयक उपक्रम राबविण्यात आला. या माध्यमातून नागरिकांना कचरा निर्मूलन योग्य रीतीने करावे तसेच कचरा साचून राहणार नाही याची दक्षता घेण्याचे महत्त्व सांगण्यात आले.


याकरिता विद्यार्थ्यांनी घरोघरी जाऊन मार्गदर्शन केले. आश्रय कॉलनी, सारथी नगर, सह्याद्री नगर परिसरात ही मोहीम राबविण्यात आली. याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
कचरा साचून राहिल्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.यामधून आजार उद्भवतात. अशावेळी नागरिकांनी प्रारंभापासून कचऱ्याच्या संकटापासून मुक्त रहावे असे मार्गदर्शन करण्यात आले. या जागृती मोहिमेमध्ये कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी फलक हाती घेऊन जागृती केली. हॉस्पिटल मधील ऑर्गेनॉन आणि कम्युनिटी मेडिसिन विभागाने संयुक्तरीत्या हा उपक्रम राबविला. याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे संयोजन आधार शिक्षण संस्थेचे चेअरमन प्राचार्य डॉ. डी. टी. बामणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. उपक्रमाचे संयोजन डॉ.सेबेस्टियन डिसोजा यांच्यासह डॉ. झाकीर हुसेन मुजावर, डॉ. सबिहा रंगरेज डॉ. मनीषा यांनी केले होते.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
शांतिनिकेतन, संत मीरा,  देवेंद्र जीनगौडाने कब्बडी स्पर्धेत गाठली अंतिम फेरीजिल्हाधिकाऱ्यांनी केले उपमुख्यमंत्र्यांचे स्वागतराखेने भरलेला ट्रक विजेच्या खांबावर आदळून झाला पलटीपाणी पुरवठा विभागाने घेतली BN7 NEWS च्या वृत्ताची दखल : अवघ्या 8 तासात केली ' त्या ' जलवाहिनीची दुरुस्ती शिवराज्याभिषेक सोहळा : ज्ञानमंदिर बनले होते शिवमयविजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यूश्री मारुती नगरला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी विद्याभारती जिल्हास्तरीय शैक्षणिक संमेल्लन उत्साहात.गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 10 लाखांची शिष्यवृत्ती : पोतदार एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम132 जणांनी केले रक्तदान : रक्तदात्यांना 1 लाखांचा विमा :  राष्ट्रीय बसव दलाचा आदर्श उपक्रम