LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

आणि आमदारांनी केली अधिकाऱ्यांची कानउघाडणी ..!

बेळगाव : आरपीडी सर्कल परिसरात भूमिगत गटार (यूजीडी)  समस्येने नागरिकांना त्रस्त केले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ही समस्या आ वासून उभी असून रस्त्यावरून वाहणारे दुर्गंधीयुक्त पाणी लोकांचे जाणे-येणे मुश्कील करीत आहे.

आमदार अभय पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह या परिसराची पाहणी करून अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.

वार्ड क्रमांक 29 मधील आरपीडी सर्कल परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून नागरिकांना त्रास देत असलेल्या भूमिगत गटार (यूजीडी) समस्येच्या निराकरणासाठी अखेर हालचाली सुरू झाल्या आहेत. स्थानिकांच्या तक्रारीची दखल घेत आमदार अभय पाटील यांनी  नगरसेवक नितीन जाधव तसेच महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत आरपीडी सर्कल परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी तेथील गंभीर यूजीडी समस्येची प्रत्यक्ष माहिती घेतली.
गेल्या अनेक महिन्यांपासून या भागातील यूजीडी लाईन तुंबल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर वाहत होते. त्यामुळे शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह स्थानिक नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
या गंभीर समस्येची दखल घेत आमदार अभय पाटील यांनी नागरिक व विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून तातडीने योग्य ती उपाययोजना करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. तसेच ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी आवश्यक कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे आदेश देत नागरिकांची गैरसोय दूर करण्यावर भर दिला.
स्थानिकांनी आमदारांच्या या तात्काळ हस्तक्षेपाचे स्वागत करत लवकरच परिसरातील यूजीडी समस्या पूर्णपणे मार्गी लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

#abhaypatil
#rpdcross 
#ugdproblem

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट मेरीज संघाला विजेतेपदशिनोळी परिसरात गणेशमूर्तींवर रंगकामाचा अखेरचा हात : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची लगबग; साडेतीनशेहून अधिक मूर्ती सज्जन्यू इंग्लिश स्कूल, मुतगे येथे पालक मेळावा उत्साहात संपन्नमंत्री सतीश जारकीहोळींवर ईडीचा छापा; निकटवर्तीयांच्या घरांवरही झडतीमेंढ्या राखताना तरुणावर मगरीचा हल्ला; पायाला गंभीर दुखापतबेळगावमध्ये उभारण्यात येणार आयटी पार्क : पालक मंत्र्यांनी दिली आराखडा तयार करण्याची सूचना अत्रिवरद मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद सेंटरचे प्रमुख चिकित्सक, वैद्य रुपेश साळुंखे यांना करण्यात आले  'कर्नाटक हेल्थकेअर वैद्यरत्न पुरस्काराने' सन्मानीतविद्याभारती राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेला प्रारंभ : बेळगाव, बळ्ळारी, हावेरी, बेंगळूर, म्हैसूर संघांचा उपांत्य फेरीत प्रवेशराज्य रँकिंग स्पर्धेत बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरीश्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती