LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

स्वातंत्र्यपूर्व काळातील जुन्या विहिरीला मिळतंय पुनरूज्जीवन 

बेळगाव : शहर आणि ग्रामीण भागातील जुन्या विहिरी आणि तलावांना पुनरूज्जीवन देऊन त्या भागातील लोकांच्या आणि जनावरांच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी धडपडणाऱ्या
प्यास फाउंडेशनने आता बेळगाव शहरापासून जवळ असणाऱ्या  मुतगे ग्रामपंचायत हद्दीतील कंचननगर येथील स्वातंत्र्यपूर्व काळातील जवळपास 300 वर्षे जुन्या विहिरीला पुनरुज्जीवन देण्याचे काम हाती घेतले आहे. 

 या कामाचा शुभारंभ नुकताच प्यास फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. माधव प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली भूमिपूजनाने झाला.
 भावी पिढीला मुबलक पाणी उपलब्ध रहावे या उद्देशाने प्यास फाउंडेशन ही संस्था जुने दुर्लक्षित तलाव व विहिरींना पुनरुज्जीवन देण्यासाठी प्रयत्नशील आहे. याच उद्देशाने कांचननगर येथील स्वातंत्र्यपूर्व काळातील जवळपास 300 वर्षे जुन्या विहिरीला पुनरुज्जीवन देण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. 
या विहिरीला पुनरुज्जीवित करून ती स्वच्छ करून तिचे नूतनीकरण करून ती ग्रामस्थांच्या स्वाधीन करणार आहोत. या कार्यात ग्रामपंचायत व गावकऱ्यांचे सहकार्यही अपेक्षित असून त्यांनी विहीर पुनरुज्जीवनाच्या कामावर लक्ष ठेवावे तसेच  विहिरीला पुनरुज्जीवित करून ती तुमच्या ताब्यात दिल्यानंतर विहिरीची ग्रामपंचायत आणि स्थानिक रहिवाशांनी व्यवस्थित देखभाल ठेवावी, असे भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना डाॅ. माधव प्रभू म्हणाले.
कार्यक्रमास भरतेश फाउंडेशनचे चेअरमन डॉ विनोद दोड्डनावर स्वाती जोग व त्यांचे सर्व सहकारी, प्यासचे उपाध्यक्ष संरक्षण दलाचे कंत्राटदार अभिमन्यू, सुभाष ओऊळकर, सूर्यकांत हिंडलगेकर, अजय आचार्य, मुतगे ग्रा.पं. पीडिओ बसवंत कडेमणी, भरमा पाटील, महावीर गुडाज, दीपक पुरी, शामराव पाटील, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सातेरी पाटील, सयाजी पाटील, सिद्धाप्पा पाटील, ॲड. अशोक बसापुरे, सुरज पाटील, बाळाराम चौगुले ॲड. हिरेमठ, कदमसर, कृष्णा पाटील, लक्ष्मण रामजी, उमेश पुरी आणि कंचननगरवासीय उपस्थित होते.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
' त्याचा ' खून प्रेमप्रकरणातूनच ...!  :  म्हणे, खुनात तीन अल्पवयीनांसह चौघांचा सहभाग ...!बस-कारचा अपघात: आठ जण जखमीओढ्याच्या पात्रात बुडून 8 जणांचा मृत्यूनिपाणी मराठा सौहार्द सहकारी संस्थेला 16.69 लाखाचा निव्वळ नफा : संस्थेचे अध्यक्ष प्रशांत नाईक यांनी दिली माहिती कॅनॉलवरील पुलाचे काम तातडीने सुरू करा, अन्यथा पाटबंधारेसह तालुका पंचायत कार्यालयाला टाळे ठोकू : रयत संघटनेचा निर्वाणीचा ईशाराविश्वकर्मा उद्यानास बेलेवाडी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची भेट' डी. व्ही. पाटील स्मृती चषक ' स्पर्धेला प्रारंभ : 28 मे पर्यंत चालणार स्पर्धा : योगेश स्पोर्ट्स क्लब आणि  विराज स्पोर्ट्स क्लब यांच्यात झाला उदघाटनपर सामना आमदार असिफ (राजू) सेट  नागरी सुविधा पाहणी  पथकाने केली अमन नगर परिसरातील नागरी सुविधांची पाहणी : साधला स्थानिक नागरिकांशी संवाद स्वातंत्र्यपूर्व काळातील जुन्या विहिरीला मिळतंय पुनरूज्जीवन आठवडी बाजारात पाकिटमारी करताना आवळल्या चोरट्यांच्या मुसक्या : पाच जणांच्या टोळीत चार महिलांचा समावेश ..!