LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

अबब ....!  पत्रकार परिषदेतच आमदार दुर्योधन ऐहोळे यांना लागली डुलकी ..!!

चिक्कोडी  : पत्रकार परिषद सुरू असतानाच आमदार दुर्योधन ऐहोळे यांना डुलकी लागली आणि प्रसार माध्यमांसाठी हा चर्चेचा विषय ठरला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळातील प्रगतीची  माहिती देण्यासाठी भाजपच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत रायबागचे आमदार दुर्योधन ऐहोळे (Duryodhan Aihole)  यांना डुलकी लागल्याची घटना चर्चेचा विषय ठरली आहे.
केंद्र सरकारच्या विविध योजनांची व कामगिरीची माहिती प्रसार माध्यमांना देण्यासाठी चिक्कोडी जिल्हा भाजप कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या माजी मंत्री व आमदार शशिकला जोल्ले (Shashikala Jolle)  या केंद्र सरकारच्या उपलब्धी आणि पंतप्रधाननरेंद्र मोदी ( Narendra Modi) यांच्या प्रशासनशैलीबाबत सविस्तर माहिती देत होत्या.
मात्र, त्यांच्या शेजारी बसलेले आमदार दुर्योधन ऐहोळे हे गंभीरयावेळी डुलक्या घेत असल्याचे दिसून आले. पत्रकार परिषदेदरम्यान त्यांच्या डुलकीचे दृश्य उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारे ठरले.
या पत्रकार परिषदेला माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ (Mahantesh Kavatagimath), माजी आमदार महेश कुमठळळी ( Mahesh Kumathalli),  चिक्कोडी जिल्हा भाजप अध्यक्ष सतीश अप्पाजीगोळ ( Satish Appajigol) यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
शांतिनिकेतन, संत मीरा,  देवेंद्र जीनगौडाने कब्बडी स्पर्धेत गाठली अंतिम फेरीजिल्हाधिकाऱ्यांनी केले उपमुख्यमंत्र्यांचे स्वागतराखेने भरलेला ट्रक विजेच्या खांबावर आदळून झाला पलटीपाणी पुरवठा विभागाने घेतली BN7 NEWS च्या वृत्ताची दखल : अवघ्या 8 तासात केली ' त्या ' जलवाहिनीची दुरुस्ती शिवराज्याभिषेक सोहळा : ज्ञानमंदिर बनले होते शिवमयविजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यूश्री मारुती नगरला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी विद्याभारती जिल्हास्तरीय शैक्षणिक संमेल्लन उत्साहात.गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 10 लाखांची शिष्यवृत्ती : पोतदार एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम132 जणांनी केले रक्तदान : रक्तदात्यांना 1 लाखांचा विमा :  राष्ट्रीय बसव दलाचा आदर्श उपक्रम