LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

‘लोटस बसदी ’च्या धर्तीवर नवीन टर्मिनल

बेळगाव: बेळगाव किल्ल्यातील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक 12 व्या शतकातील वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या लोटस बसदी या स्मारकाची प्रेरणा घेऊन बेळगावचे सांबरा विमानतळ येथे नवीन टर्मिनल इमारतीचे बांधकाम करण्यात येत आहे. स्थानिक वारसा आणि सांस्कृतिक वैभव जगासमोर आणण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
लोटस बसदीच्या छतावर दगडात कोरलेले 72 पाकळ्यांचे उलटे कमळ हे विशेष आकर्षण आहे. या अनोख्या शिल्पकलेमुळेच या वास्तूला ‘लोटस बसदी’ हे नाव मिळाले आहे. याच वैशिष्ट्यपूर्ण रचनेच्या धर्तीवर सांब्रा विमानतळाचे नवीन टर्मिनल उभारले जात असून, त्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. वर्षअखेरीस सर्व कामे पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
सध्या सांब्रा विमानतळावर एकावेळी सुमारे 270 प्रवाशांची क्षमता आहे. मात्र नवीन टर्मिनलमध्ये ही क्षमता तब्बल चारपट वाढवून 1200 प्रवाशांपर्यंत करण्यात आली आहे. आगमन आणि प्रस्थान अशा दोन्ही विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुविधा उपलब्ध होणार आहेत.
नवीन टर्मिनलमध्ये आधुनिक तंत्रज्ञानयुक्त चार एरोब्रिज उभारण्यात येत आहेत. त्यामुळे प्रवाशांना थेट विमानात प्रवेश करता येणार आहे. तसेच एस्कलेटर, लिफ्ट, कार आणि बस पार्किंग सुविधांमध्येही मोठी वाढ करण्यात आली आहे.
यापूर्वी विमानतळावर केवळ तीन विमानांच्या पार्किंगची व्यवस्था होती. आता ती वाढवून 12 एअर बस ए 321 विमानांसाठी पार्किंगची क्षमता निर्माण करण्यात आली आहे.
स्थानिक ऐतिहासिक वारसा आणि आधुनिक विमानतळ सुविधांचा संगम घडवणारे हे नवीन टर्मिनल प्रवासी आणि पर्यटकांसाठी एक वेगळाच अनुभव ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
शहापूर पोलिसांनी केले 15 लाख 73 हजार 370 रुपये किमतीचे 103.97 ग्रॅम वजनाचे सोने जप्त समाजाच्या अगतिकेला आपण क्रौर्य ठरवणार काय? : डॉ.शेवडे यांचा सवालजनआक्रोशाला घाबरून कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री बदलले : पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर शाब्दिक हल्लाबोल' मला दुःख झाले नाही आणि विशेष आनंदही झालेला नाही : खातेवाटपाबद्दल सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केली प्रतिक्रिया‘लोटस बसदी ’च्या धर्तीवर नवीन टर्मिनलमंत्रिमंडळात एच.के. पाटील, रामलिंगा रेड्डी यांच्यावर अन्याय :  बेळगाव रेड्डी संघाचा संताप, तीव्र आंदोलनाचा इशाराबालिका आदर्श विद्यालयाच्या एनसीसी ग्रुपच्यावतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा : विविध प्रकारच्या रोपांची करण्यात आली लागवडडॉ. संतोष जयगौडर म्हणाले, ' पर्यावरणाचे संरक्षण ही काळाची गरज ' ...!! आरपीडी कॉलेजमध्ये साजरा झाला जागतिक पर्यावरण दिनराहुल गांधींनी घेतली कठोर भूमिका: म्हणाले, ' रामलिंगा रेड्डी यांची समजूत काढा. नाही मानलं तर राजीनामा स्वीकारा पत्नीवर घातला कुऱ्हाडीने घाव :  न्यायालयाने पतीला ठोठावली 5 वर्षांची शिक्षा