LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

जिल्हा इस्पितळात पूर्णवेळ डॉक्टर नियुक्त करावा 

राष्ट्रवादीचे जिल्हाप्रशासनाला निवेदन

news_1779281345_0_552.webp

 

बेळगाव :  बेळगाव जिल्हा इस्पितळात पूर्णवेळ डॉक्टर नियुक्त करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) बेळगाव जिल्हा शाखेने जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

जिल्हा इस्पितळात पूर्णवेळ डॉक्टर नियुक्त करावा या मागणीबरोबरच पॅरा-मेडिकल, नर्सिंग, रेडिओलॉजिकल सेवेसह कर्मचारी वर्गाची संख्या वाढवावी, अशी मागणीही  यावेळी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) बेळगाव जिल्हा शाखेचे अध्यक्ष दुर्गेश मेत्री यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन  जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. 

बेळगावात एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे. तथापि या हॉस्पिटलसह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. या हॉस्पिटलमध्ये डी ग्रुप कर्मचाऱ्यांना व्यवस्थित पगार दिला जात नाही. या गोष्टींचा परिणाम तेथील वैद्यकीय सेवेवर होत आहे. तेंव्हा याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन या सरकारी हॉस्पिटलमध्ये प्रत्येक विभागात विशेष करून प्रसूती विभागात 24 तास डॉक्टर उपलब्ध ठेवावेत. एकंदर सिव्हिल हॉस्पिटलच्या माध्यमातून लोकांना दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळावी, असे यावेळी सांगण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) जिल्हा सचिव महांतेश कोळूचे, माजी जिल्हाध्यक्ष राजू पाटील, ॲड. रमेश चौगुले, ॲड. वैभव कुट्रे, राजदिल जमादार, प्रसाद मरगाळे, हरी पवार, ओमकार काकतीकर आदी उपस्थित होते.

#rashtravadi, #memorandam, #belgaum, #todaynews

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
श्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती  होन्निहाळ येथील 'त्या' खून खटल्यात 6 ऑगस्टला सुनावण्यात येणार शिक्षा ?धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा युवकांचा विजय; लोकशाहीचा विजय असल्याचा सिद्धरामय्या यांचा दावाबायपाससाठी जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध; एकरी ₹5 कोटी भरपाईच्या मागणीसाठी 30 जुलैला चक्काजाम आंदोलनधावत्या बसमध्ये सुरू झाला वाद; विद्यार्थ्यांमध्ये बेल्ट, दगड आणि काठ्यांनी तुफान हाणामारी!सेवानिवृत्तीनिमित्त सविता चंदगडकर-निकम यांचा वेदांत-गुरुस्पंदनने केला सन्मान मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते खरीप पीकविमा योजनेच्या माहितीपत्रकाचे प्रकाशनराजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाईन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद :  1011 विद्यार्थ्यांनी घेतला होता स्पर्धेत सहभागभडगावजवळील पूल कोसळला :  गडहिंग्लज-नेसरी रस्ता बंद मुडलगीत पावसासाठी गाढवांचा विवाह :  निमंत्रणपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल