LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

हृदयविकाराच्या झटक्याने 6 वर्षीय बालकाचा मृत्यू ..!

शिवमोग्गा : हृदयविकाराच्या झटक्याने 6 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. सागर तालुक्यातील हाळससी गावातील शालेय आवारात ही दुर्दैवी घटना घडली आहे.

त्रिलोक जैन असे मृत बालकाचे नाव आहे. तो कोडनवल्ली गावातील गौतम जैन आणि शिल्पा जैन यांचा मुलगा होता. तो हाळससी येथील सरकारी वरिष्ठ प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीत शिक्षण घेत होता.
शनिवारी दुपारी शाळा सुटण्याच्या सुमारास तो शाळेच्या आवारात अचानक कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले; मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
एकुलत्या मुलाच्या निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. गावकरी, शाळा विकास समितीचे सदस्य तसेच मुख्याध्यापकांनी त्रिलोकच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
माजी सैनिक हत्या प्रकरणात एफएसएल अधिकाऱ्यांचा  सहभाग ...? मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याविरोधातील अवमानकारक वक्तव्याचा निषेध :  रासिंगे यांच्या हकालपट्टीची दलित नेत्यांनी केलीय  मागणीबेळगावकरांनो सावधान ...! वाहतूक नियमभंगावर आहे, आता एआयची नजर ...!!हेल्मेट नसल्यास आता मिळणार नाही पेट्रोल ...? हेल्मेट जनजागृतीसाठी अनोखा प्रयोग :  हेल्मेट नसल्यास पेट्रोल न देण्याचे बेळगाव पोलिसांनी केलंय आवाहन ..!मधुमेहाबाबत अनावश्यक भीती बाळगू नका : डॉ. संदीप श्रीवास्तवभूमी वात्सल्य फाऊंडेशनतर्फे शैक्षणिक साहित्य वाटपासह करण्यात आले वृक्षारोपण'रवळनाथ' हौसिंग फायनान्सच्या सेवकांना सुधारित वेतन लागू :  संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांनी दिली माहितीबोरगाव सर्कल रुंदीकरण कामात दुजाभाव अधिकारी, लोकप्रतिनिधीसहस्थानिक नेत्यांनी लक्ष देण्याची मागणी जुगार अड्ड्यावर छापा :  20 जण अटकेतबँकॉकहून आणण्यात आलेला 13.14 कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा कस्टमकडून जप्त : सहा जणांना अटक