LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

जिन्यावरून खाली पडून 2 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

नेलमंगल : घरात खेळत असताना पहिल्या मजल्यावरून पडल्याने 2 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बेंगळूर ग्रामीण जिल्ह्यातील नेलमंगल तालुक्यातील तोटदगुड्डदहळ्ळी येथे घडली.
मृत मुलाचे नाव दीक्षित असे आहे. अपघातानंतर दीक्षित तब्बल 24 तास कोमामध्ये होता. मात्र उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली.
घटनेची माहिती मिळताच मादनायकनहळ्ळी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दासरहळ्ळी येथील नवीन कुमार आणि काव्या हे दाम्पत्य आपल्या मुलासह दोन दिवसांपूर्वी नातेवाईकांच्या घरी आले होते. यावेळी घरात खेळत असताना दीक्षित हा इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील जिन्यावरून खाली कोसळला.
अपघातानंतर पालकांनी तातडीने त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी नेलमंगळ येथील शवागारात पाठविण्यात आला आहे.
चिमुकल्या मुलाच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, पालकांचा आक्रोश पाहून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट मेरीज संघाला विजेतेपदशिनोळी परिसरात गणेशमूर्तींवर रंगकामाचा अखेरचा हात : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची लगबग; साडेतीनशेहून अधिक मूर्ती सज्जन्यू इंग्लिश स्कूल, मुतगे येथे पालक मेळावा उत्साहात संपन्नमंत्री सतीश जारकीहोळींवर ईडीचा छापा; निकटवर्तीयांच्या घरांवरही झडतीमेंढ्या राखताना तरुणावर मगरीचा हल्ला; पायाला गंभीर दुखापतबेळगावमध्ये उभारण्यात येणार आयटी पार्क : पालक मंत्र्यांनी दिली आराखडा तयार करण्याची सूचना अत्रिवरद मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद सेंटरचे प्रमुख चिकित्सक, वैद्य रुपेश साळुंखे यांना करण्यात आले  'कर्नाटक हेल्थकेअर वैद्यरत्न पुरस्काराने' सन्मानीतविद्याभारती राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेला प्रारंभ : बेळगाव, बळ्ळारी, हावेरी, बेंगळूर, म्हैसूर संघांचा उपांत्य फेरीत प्रवेशराज्य रँकिंग स्पर्धेत बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरीश्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती