LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

50 लाख खर्चाच्या विकासकामांना मुतगा गावात चालना

बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील मुतगा गावातील शिवाजी गल्ली आणि एक्सटेंशन परिसरात सुमारे 50 लाख रुपये खर्चून निर्माण करण्यात येणाऱ्या रस्ते कामाचा भूमिपूजन करून अधिकृतपणे रस्ते निर्माण कामाचा शुभारंभ करण्यात आला.


याप्रसंगी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि युवा काँग्रेसचे नेते मृणाल हेब्बाळकर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करून कामाला चालना देण्यात आली.


मतदारसंघातील प्रत्येक गावाला मूलभूत सुविधा पुरविणे आणि चांगले रस्ते निर्माण करून गावकऱ्यांचे ये-जा सुलभ करणे, हा मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा निर्धार आहे. त्याच अनुषंगाने हे रस्त्याचे काम हाती घेण्यात आले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
प्रत्येक गावापर्यंत विकासाची गंगा पोहोचवून ग्रामविकास करणे आणि लोकांना सर्व त्या मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी मंत्री आणि ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे उद्दिष्ट असल्याचे युवा काँग्रेसचे नेते मृणाल हेब्बाळकर यावेळी बोलताना म्हणाले.
याप्रसंगी गावातील ज्येष्ठ नागरिक, स्थानिक रहिवासी, पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
शांतिनिकेतन, संत मीरा,  देवेंद्र जीनगौडाने कब्बडी स्पर्धेत गाठली अंतिम फेरीजिल्हाधिकाऱ्यांनी केले उपमुख्यमंत्र्यांचे स्वागतराखेने भरलेला ट्रक विजेच्या खांबावर आदळून झाला पलटीपाणी पुरवठा विभागाने घेतली BN7 NEWS च्या वृत्ताची दखल : अवघ्या 8 तासात केली ' त्या ' जलवाहिनीची दुरुस्ती शिवराज्याभिषेक सोहळा : ज्ञानमंदिर बनले होते शिवमयविजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यूश्री मारुती नगरला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी विद्याभारती जिल्हास्तरीय शैक्षणिक संमेल्लन उत्साहात.गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 10 लाखांची शिष्यवृत्ती : पोतदार एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम132 जणांनी केले रक्तदान : रक्तदात्यांना 1 लाखांचा विमा :  राष्ट्रीय बसव दलाचा आदर्श उपक्रम