LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

बदामी बनशंकरी देवस्थानसाठी घडवला 150 किलोचा चांदीचा रथ ..!

निपाणी : निपाणी येथील अप्पय्या शिवरुद्रप्पा शेट्टी सराफ दुकानातून बदामी येथील बनशंकरी देवस्थानासाठी तब्बल 150 किलो वजनाचा चांदीचा रथ बनवण्यात आला आहे. शनिवार दिनांक 13 रोजी देवस्थान कमिटी पदाधिकाऱ्याकडे हा रथ सुपूर्द करण्यात आला.  यावेळी समाधी मठातील प्राणलिंग स्वामीजी उपस्थित होते.

प्रारंभी प्राणलिंग स्वामी आणि महिलांच्या हस्ते रथाची पूजा करण्यात आली. त्यानंतर आरती करून देवस्थान कमिटीकडे हा चांदीचा रथ पाठविण्यात आला.
150  किलो वजनाचा चांदीचा रथ बनवण्यासाठी 6 महिन्याचा कालावधी लागला. त्यासाठी दररोज 25 कामगार कार्यरत होते. या रथावर, सिंहाच्या मूर्तीसज्ह विविध देवदेवतांची आकर्षक कलाकुसर केली आहे. याशिवाय रथामध्ये दहा किलोची चांदीची मूर्ती तयार करण्यात आली आहे, अशी माहिती रवींद्र शेट्टी यांनी दिली आहे. 
यावेळी अमर बागेवाडी, महालिंगेश कोठीवाले, डॉ. सी.बी. कुरबेट्टी, शिवानंद पुराणिकमठ, आदित्य शेट्टी, कार्तिक शेट्टी, महेश बागेवाडी, अशोक दुमाले, ललिता शेट्टी, हालसिद्धनाथ साखर कारखान्याच्या उपाध्यक्षा गीता पाटील सविता शेट्टी, विजया शेट्टी, रश्मी शेट्टी, राजेंद्र वाळवे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. 

अप्पय्या शिवरुद्रप्पा शेट्टी सराफ दुकानातून यापूर्वी बेल्लद बागेवाडी मधील जडी सिद्धेश्वर देवस्थानासाठी 45 किलो वजनाच्या तर सिद्धेश्वर देवस्थानासाठी साठी 45  किलो वजनाच्या 2 पालख्या बनवल्या होत्या. निपाणी महादेव मंदिरासाठी चांदीची पालखी, तोरणहळ्ळी हनुमान मंदिरासाठी चांदीची पालखी, मुधोळ, येडूर, कोळीगुड येथे चांदीच्या पालख्या बनवून दिल्या आहेत, असे सुरेश शेट्टी यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले आहे.

----

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट मेरीज संघाला विजेतेपदशिनोळी परिसरात गणेशमूर्तींवर रंगकामाचा अखेरचा हात : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची लगबग; साडेतीनशेहून अधिक मूर्ती सज्जन्यू इंग्लिश स्कूल, मुतगे येथे पालक मेळावा उत्साहात संपन्नमंत्री सतीश जारकीहोळींवर ईडीचा छापा; निकटवर्तीयांच्या घरांवरही झडतीमेंढ्या राखताना तरुणावर मगरीचा हल्ला; पायाला गंभीर दुखापतबेळगावमध्ये उभारण्यात येणार आयटी पार्क : पालक मंत्र्यांनी दिली आराखडा तयार करण्याची सूचना अत्रिवरद मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद सेंटरचे प्रमुख चिकित्सक, वैद्य रुपेश साळुंखे यांना करण्यात आले  'कर्नाटक हेल्थकेअर वैद्यरत्न पुरस्काराने' सन्मानीतविद्याभारती राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेला प्रारंभ : बेळगाव, बळ्ळारी, हावेरी, बेंगळूर, म्हैसूर संघांचा उपांत्य फेरीत प्रवेशराज्य रँकिंग स्पर्धेत बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरीश्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती