LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 10 लाखांची शिष्यवृत्ती : पोतदार एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम

बेळगाव : आर्थिकदृष्ट्या दुर्बल पण गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने श्री वसंतराव आणि आशाबाई पोतदार एज्युकेशन ट्रस्टतर्फे सोमवारी शिष्यवृत्ती वितरण समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी विविध शाळांतील गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमात बोलताना ट्रस्टचे अध्यक्ष अविनाश पोतदार यांनी सांगितले की, आर्थिक अडचणींमुळे कोणताही गुणवंत विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, या उद्देशाने ट्रस्ट कार्यरत आहे.
ते म्हणाले, “माणसामध्ये अहंकार नसावा. अहंकारामुळे यश मिळत नाही. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या पालकांचे, गावाचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी शिक्षण घ्यावे. चांगल्या शिक्षणासोबत मानवी मूल्ये जोपासून समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व घडवावे. गुणवंत विद्यार्थ्यांची ओळख करून त्यांना आवश्यक आर्थिक मदत करणे हे आमच्या ट्रस्टचे प्रमुख ध्येय आहे.”
ट्रस्टचे सदस्य अनिल पोतदार यांनी सांगितले की, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील विद्यार्थ्यांसाठी शाळेची फी भरणे हे मोठे आव्हान असते. ही बाब लक्षात घेऊन यंदा ट्रस्टने गरीब व गुणवंत विद्यार्थ्यांच्या शालेय शुल्कासाठी 10 लाखांचा निधी राखून ठेवला आहे.
ते म्हणाले, “शिष्यवृत्तीअभावी कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण अर्धवट राहू नये, यासाठी त्यांच्या संपूर्ण शालेय शुल्काचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, बूट, छत्री आदी आवश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले होते. यंदा शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. भविष्यात आणखी शाळांमधील विद्यार्थ्यांपर्यंत ही योजना विस्तारण्याचा आमचा मानस आहे.”
शिक्षण हा प्रत्येक मुलाचा जन्मसिद्ध हक्क असून आरोग्य, शिक्षण आणि अन्न यांसारख्या मूलभूत गरजा समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमात बीके मॉडेल स्कूलसह विविध शाळांतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे पदाधिकारी, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षण क्षेत्रात समाजाभिमुख कार्य करत गरीब व गुणवंत विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणाऱ्या पोतदार एज्युकेशन ट्रस्टच्या या उपक्रमाचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
शिवराज्याभिषेक सोहळा : ज्ञानमंदिर बनले होते शिवमयविजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यूश्री मारुती नगरला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी विद्याभारती जिल्हास्तरीय शैक्षणिक संमेल्लन उत्साहात.गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 10 लाखांची शिष्यवृत्ती : पोतदार एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम132 जणांनी केले रक्तदान : रक्तदात्यांना 1 लाखांचा विमा :  राष्ट्रीय बसव दलाचा आदर्श उपक्रममतदार यादीच्या विशेष सघन पुनरावलोकनाबाबत जनजागृती रॅलीविद्याभारती जिल्हास्तरीय कबड्डी, बुद्धिबळ, कराटे स्पर्धा उद्यापासूनशालेय स्तरावर स्पर्धा परीक्षाना अधिक महत्व द्यावे :सबलेफ्टनंट सुयश नुल्ले यांनी व्यक्त केले मतवृक्षारोपणातून दिला सामाजिक सलोख्यासह पर्यावरण संवर्धनाचा संदेश : मोहरम, शाहू जयंतीनिमित्त 'भूमी वात्सल्य फाउंडेशन' कडून उपक्रमाचे आयोजन