LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

महाराष्ट्र राज्य आरोग्यमंत्री प्रकाश आनंदराव आबिटकर यांची संजय अरुण पंतबाळेकुंद्री यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्य आरोग्यमंत्री प्रकाश आनंदराव आबिटकर (रा.भुदरगड) यांची अक्कोळ येथे सदिच्छा भेट दिली. 
आरोग्यमंत्री प्रकाश आनंदराव आबिटकर यांनी सद्गुरु श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांचे वंशज व दत्त संस्थान ट्रस्टी डॉ. संजय अरुण पंतबाळेकुंद्री यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन पंतप्रतिमेचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला.


आ. प्रकाशराव आबिटकर यांची महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालक मंत्री म्हणून नेमणूक झाल्याबद्दल डॉ. संजय पंतबाळेकुंद्री यांच्याकडून आ.प्रकाश आनंदराव आबिटकर यथोचित शाल- श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
महाराष्ट्रातील व भुदरगड तालुक्यामध्ये विविध योजना,मंदिर अनुदान, सर्वसामान्याना सर्वोत्तम आरोग्य सुविधा पुरविणारा व निरंतर समाज उपयोगी सेवा देणारा, प्रभावी कार्यशैली असणारा युवा नेता म्हणून आरोग्यमंत्री प्रकाशराव आबिटकर यांची ओळख आहे. मंत्र्यांचे लहान भाऊ व कोल्हापूर डीसीसी बँकेचे संचालक प्रा. अर्जुन आबिटकर यांनी सुध्दा काही महिन्यापूर्वी डॉ.संजय पंत यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली होती.


आबिटकर यांचा अकोळ ग्रामपंचायत मार्फत अध्यक्ष इंद्रजीत सोळांकुरे, वीरेंद्र पाटील, रणजीत सदावर्ते व ग्रामपंचायत सदस्यांमार्फत स्वागत व सत्कार करण्यात आला.
या भेटी प्रसंगी श्री योगेश पाटील (बारवे ), चंद्रकांत सुतार (गारगोटी), अनंत पवार (लिंगनूर), रामनारायण कुलकर्णी , दिलीप सदावर्ते, आप्पासो चिंचवाडे, रमेश कुलकर्णी, चंद्रकांत पाटील (कौलगे), सागर शिंदे (भुदरगड), अरुण दाभोळे (वाघापूर), श्रीपती सुर्यवंशी इत्यादी नागरिक उपस्थित होते.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
शांतिनिकेतन, संत मीरा,  देवेंद्र जीनगौडाने कब्बडी स्पर्धेत गाठली अंतिम फेरीजिल्हाधिकाऱ्यांनी केले उपमुख्यमंत्र्यांचे स्वागतराखेने भरलेला ट्रक विजेच्या खांबावर आदळून झाला पलटीपाणी पुरवठा विभागाने घेतली BN7 NEWS च्या वृत्ताची दखल : अवघ्या 8 तासात केली ' त्या ' जलवाहिनीची दुरुस्ती शिवराज्याभिषेक सोहळा : ज्ञानमंदिर बनले होते शिवमयविजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यूश्री मारुती नगरला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी विद्याभारती जिल्हास्तरीय शैक्षणिक संमेल्लन उत्साहात.गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 10 लाखांची शिष्यवृत्ती : पोतदार एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम132 जणांनी केले रक्तदान : रक्तदात्यांना 1 लाखांचा विमा :  राष्ट्रीय बसव दलाचा आदर्श उपक्रम