LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

मंत्री सतीश जारकीहोळींवर ईडीचा छापा; निकटवर्तीयांच्या घरांवरही झडती

बेळगाव : सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी तसेच त्यांचे नातेवाईक आणि निकटवर्तीयांशी संबंधित १५ ठिकाणी बुधवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) एकाच वेळी छापे टाकले. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा येथे राहणाऱ्या तसेच विविध व्यवसायांमध्ये भागीदार असलेल्या सतीश जारकीहोळी यांच्या निकटवर्तीयांचीही ईडीकडून चौकशी सुरू आहे.
बेळगाव शहरातील सतीश जारकीहोळी यांचे मेहुणे आणि अबकारी विभागाचे अतिरिक्त आयुक्त मंजुनाथ यांच्या घरावर ईडीने दुसऱ्यांदा छापा टाकला. यापूर्वी २४ जून रोजी त्यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापा टाकण्यात आला होता. त्यावेळी सुमारे ₹१३.३ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. यात ₹५.५ कोटी रोख रक्कम, ₹७.८ कोटी किमतीचे सोन्याचे दागिने, परदेशी चलन आणि मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे सापडली होती.
कागदपत्रांच्या तपासणीत मंजुनाथ आणि सतीश जारकीहोळी यांचे पुत्र राहुल जारकीहोळी हे अनेक व्यवसायांमध्ये भागीदार असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे मंजुनाथ यांच्या घरावर पुन्हा छापा टाकण्यात आला आहे.
बेळगावच्या लक्ष्मीटेकडी परिसरातील सतीश जारकीहोळी यांचे निकटवर्तीय डॉ. गिरीश सोनावळकर यांच्या घरावरही ईडीने छापा टाकून तपास सुरू केला आहे.
तसेच बेळगावमधील उद्योजक राजू धरगशेट्टी आणि विठ्ठल परसण्णवर यांच्या घरांचीही झडती घेण्यात आली. हे दोघेही मंत्री सतीश जारकीहोळी यांचे निकटवर्तीय असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, सतीश जारकीहोळी यांचे मूळ ठिकाण असलेल्या गोकाक शहरातील हिल गार्डन येथील त्यांच्या निवासस्थानीही ईडीची कारवाई सुरू आहे. गोकाकमधील त्यांच्या आणखी दोन निकटवर्तीयांच्या घरांवरही छापे टाकण्यात आले आहेत.
या कारवाईत बेंगळुरू आणि गोवा येथील ईडी अधिकाऱ्यांचे पथक सहभागी असून सुरक्षेसाठी निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
मंत्री सतीश जारकीहोळींवर ईडीचा छापा; निकटवर्तीयांच्या घरांवरही झडतीमेंढ्या राखताना तरुणावर मगरीचा हल्ला; पायाला गंभीर दुखापतबेळगावमध्ये उभारण्यात येणार आयटी पार्क : पालक मंत्र्यांनी दिली आराखडा तयार करण्याची सूचना अत्रिवरद मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद सेंटरचे प्रमुख चिकित्सक, वैद्य रुपेश साळुंखे यांना करण्यात आले  'कर्नाटक हेल्थकेअर वैद्यरत्न पुरस्काराने' सन्मानीतविद्याभारती राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेला प्रारंभ : बेळगाव, बळ्ळारी, हावेरी, बेंगळूर, म्हैसूर संघांचा उपांत्य फेरीत प्रवेशराज्य रँकिंग स्पर्धेत बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरीश्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती  होन्निहाळ येथील 'त्या' खून खटल्यात 6 ऑगस्टला सुनावण्यात येणार शिक्षा ?धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा युवकांचा विजय; लोकशाहीचा विजय असल्याचा सिद्धरामय्या यांचा दावाबायपाससाठी जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध; एकरी ₹5 कोटी भरपाईच्या मागणीसाठी 30 जुलैला चक्काजाम आंदोलन