LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

तब्बल 5.10 लाखांना विकली गेली दोन बकरी ....!

बेळगाव : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरी बाजारात चांगलीच उलाढाल झाली असून बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील इटनाळ गावात बकरी दराने उच्चांक गाठला. दोन बकरी तब्बल 5 लाख 10 हजार रुपयांना विकली गेली.
इटनाळच्या शिवाप्प शेंडूरे यांनी पाळलेल्या दोन बकऱ्यां तब्बल 5.10 लाखांना विकल्या गेल्या.


यापैकी एक बकरे 3 लाखांना तर दुसरे बकरे 2 लाख 10 हजार रुपयांना विकले गेले. विजापूर येथील व्यापारी मोजीम व आसिफ यांनी ही दोन्ही बकरी खरेदी केल्याचे समजते.
बकरी ईदसाठी तब्बल 15 दिवस आधीच या बकऱ्यांसाठी ऍडव्हान्स रक्कम देण्यात आली होती आणि नुकतेच बाकीचे पैसे देऊन बकरी विकण्यात आली.


बकऱ्यांवर गुलाल उधळून तसेच त्यांना हार घालून, पूजा अर्चा केल्यानंतर बकऱ्यांची आरती ओवाळून बकऱ्यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला.


4 फूट उंचीच्या या दोन्ही बकऱ्यांचे वय 2.5 वर्षे असून, प्रत्येक बकऱ्याचे वजन सुमारे दोन क्विंटल आहे.
मूळची पंजाबची बिटल जातीची ही बकरी अंगाने मोठी, लांब कान व लहान चेहऱ्याची आहेत. या जातीच्या बकऱ्यांच्या मांसासाठी मोठ्या प्रमाणात मागणी असते. बकरी ईदच्या काळात विशेषतः बीटल जातीच्या बकऱ्यांना प्रचंड मागणी असते, कारण या जातीचे मांस दर्जेदार असते असे सांगितले जाते.


[video width="544" height="960" mp4="https://bn7news.in/wp-content/uploads/2025/06/VID-20250602-WA0405.mp4"][/video]

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
श्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती  होन्निहाळ येथील 'त्या' खून खटल्यात 6 ऑगस्टला सुनावण्यात येणार शिक्षा ?धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा युवकांचा विजय; लोकशाहीचा विजय असल्याचा सिद्धरामय्या यांचा दावाबायपाससाठी जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध; एकरी ₹5 कोटी भरपाईच्या मागणीसाठी 30 जुलैला चक्काजाम आंदोलनधावत्या बसमध्ये सुरू झाला वाद; विद्यार्थ्यांमध्ये बेल्ट, दगड आणि काठ्यांनी तुफान हाणामारी!सेवानिवृत्तीनिमित्त सविता चंदगडकर-निकम यांचा वेदांत-गुरुस्पंदनने केला सन्मान मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते खरीप पीकविमा योजनेच्या माहितीपत्रकाचे प्रकाशनराजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाईन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद :  1011 विद्यार्थ्यांनी घेतला होता स्पर्धेत सहभागभडगावजवळील पूल कोसळला :  गडहिंग्लज-नेसरी रस्ता बंद मुडलगीत पावसासाठी गाढवांचा विवाह :  निमंत्रणपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल