LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

उद्या डी. के. शिवकुमार घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

बेंगळूर : कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) उद्या बुधवारी शपथ घेणार आहेत. लोकभवन येथे होणाऱ्या साध्या समारंभात ते मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारतील. 

या कार्यक्रमासाठी मान्यवरांना तीन प्रकारचे पास वितरित करण्याची तयारी करण्यात आली आहे.
लोकभवनातील ग्लास हाऊसमध्ये सायंकाळी 4.05 वाजता शपथविधी समारंभ पार पडणार आहे. कार्यक्रमाच्या तयारीला अंतिम स्वरूप देण्यात आले असून  या शपथ विधी सोहळ्याला स्वामीजी, चित्रपटसृष्टीतील कलाकार, आमदार, माजी मंत्री यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 
कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रमुख नेत्यांच्या कुटुंबीयांसाठी आणि समर्थकांसाठी स्वतंत्र आसनव्यवस्था करण्यात आली आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्ती (VVIP), महत्त्वाच्या व्यक्ती (VIP) आणि सर्वसामान्यांसाठी स्वतंत्र पासची व्यवस्था करण्यात आली असून, उपस्थितांनी दुपारी 2 वाजण्यापूर्वी लोकभवनात पोहोचावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोणताही आवडंबर न करता साधेपणाने हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. दरम्यान, उद्या होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अंतिम तयारीची पाहणी राज्यपाल थावरचंद गेहलोत (Thawar Chand Gehlot) यांनी देखील केली आहे.

#DKShivkumar 
#ThavarchandGehlot 
#dkshioathceremony

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
मुलाने वृद्ध आईला सोडले निर्जनस्थळी ?लॉरी-कारची धडक : 5 जण गंभीर जखमी4 जून रोजी बाळेकुंद्री उपकेंद्रातून होणारा वीजपुरवठा केला जाणार खंडितदोन दुचाकींची अमोरासमोरून झाली धडक : अपघातात एकाचा जागीच मृत्यू : दुसरा दुचाकीस्वार गंभीरदोन दुचाकींची अमोरासमोरून झाली धडक : अपघातात एकाचा जागीच मृत्यू : दुसरा दुचाकीस्वार गंभीरकाळ आला होता पण .....! भीषण अपघात : मात्र सुदैवाने जीवितहानी टळली ..!!आमदार संतोष लाड यांना मंत्रीपद देण्याची केली जातेय मागणी डिकेशी म्हणाले, 'मुख्यमंत्री होत आहे तो मी नाही, तर पक्षाचा कार्यकर्ता मुख्यमंत्री होतोय ..! 'उद्या डी. के. शिवकुमार घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथखर्गे यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक :