LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

करंबळ ग्रामपंचायत पिडीओंच्या निलंबनाची होतेय मागणी ..!

खानापूर : करंबळ ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी (पीडीओ) गांधी एल्लारी गौडा यांनी करंबळ येथील ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक तसेच मराठा मंडळ शिक्षण संस्थेचे संचालक शिवाजी पाटील यांच्याशी अवमानकारक व अरेरावीची भाषा वापरल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या घटनेमुळे करंबळसह ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून संबंधित अधिकाऱ्यावर चौकशी करून कठोर शिस्तभंगाची कारवाई व निलंबनाची मागणी होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी पाटील यांच्या घरासमोरील गटारात अनेक दिवसांपासून कचरा व सांडपाणी तुंबून राहिल्याने परिसरात अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत त्यांनी ग्रामपंचायतीकडे वारंवार पाठपुरावा करून गटार स्वच्छ करण्याची मागणी केली होती. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप आहे.
अखेरीस या प्रश्नाबाबत जाब विचारण्यासाठी शिवाजी पाटील यांनी पीडीओ गांधी एल्लारी गौडा यांच्याशी संपर्क साधला. यावेळी गटार स्वच्छतेची मागणी केल्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी उद्धट व अरेरावीच्या सुरात उत्तर दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. “तुमच्या घरासमोरील गटार स्वच्छ करणार नाही, कुणाकडे जायचे ते जा, कोणाला सांगायचे ते सांगा, काय करायचे ते करा,” अशा प्रकारची भाषा वापरून ज्येष्ठ नागरिकांचा अपमान केल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, समाजात मानाचे स्थान असलेल्या व्यक्तीशी अशा प्रकारची वागणूक देणे हे निषेधार्ह असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. लोकसेवक म्हणून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून अपेक्षित असलेली जबाबदारी, संयम आणि नागरिकांप्रती आदरभाव या प्रकरणात दिसून आला नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
दरम्यान, करंबळ ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबतही नागरिकांमध्ये नाराजी वाढली असून संबंधित पीडीओ मनमानी पद्धतीने काम करत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
याप्रकरणी तातडीने कारवाई न झाल्यास करंबळ व परिसरातील नागरिक लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा देत असून प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
बालवीर विद्यानिकेतनमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे जंगी स्वागतकरंबळ ग्रामपंचायत पिडीओंच्या निलंबनाची होतेय मागणी ..!शिंदोगी फाट्यावर शेतकऱ्यांचा अहोरात्र एल्गार : आमदार वैद्य म्हणाले, ' सायफन दुरुस्ती लवकरच पूर्ण केली जाईल 'मुदतीत विशेष मतदार यादी पुनरावलोकन पूर्ण करा : आयुक्त कार्तिक एम यांची सूचनाजीआरबीसी कालव्यात पाणी सोडण्याची मागणी : आमदार भालचंद्र जारकीहोळी यांचे प्रादेशिक आयुक्तांना निवेदनटिळकवाडी पोलिसांनी घातक शस्त्र बाळगणाऱ्या तरुणाला घेतले ताब्यात बेळगावच्या स्केटिंगपटूंनी दिला ' झाडे लावा, झाडे जगवा ' चा  संदेशराज्य सरकारने केला विद्यार्थ्यांना गणवेशात बदल : यंदा मिळणार सुतिमिश्रित कापड स्वर्गीय सुरेश अंगडी यांच्या जन्मदिनानिमित्त गणेश मंदिरात करण्यात आली प्रार्थनानियोजनशून्य नगरपालिका : जलवाहिन्यांना गळत्या:  लोकांची पाण्यासाठी होतेय वणवण