LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय नाही : सतीश जारकीहोळी यांचा इशारा

बेळगाव : कर्तव्यकसुर आणि विकास कामांमध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या बेजबाबदार अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. अशा अधिकाऱ्यांना बेळगाव जिल्ह्यात कार्य करण्याची संधी दिली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिला आहे.


“विकास कामांसाठी आम्ही अधिकाऱ्यांना नेहमीच सहकार्य करत आलो आहोत. मात्र, प्रत्येक निर्णयासाठी मुख्यमंत्री किंवा आम्हीच सुचना देणे शक्य नाही. जर अधिकाऱ्यांनी विकासात उदासीनता दाखवली किंवा कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी नीट पार पाडली नाही, तर अशा अधिकाऱ्यांना जिल्ह्यातून हटवले जाईल, असे ”पत्रकारांशी बोलताना सतीश जारकीहोळी म्हणाले.


जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी समजून काम करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणे, तसेच जनतेच्या हिताचे संरक्षण करणे हे प्राथमिक कर्तव्य आहे. काही घटनांमध्ये पोलिस प्रशासन अपयशी ठरल्यामुळेच पोलिस आयुक्तांची बदली करण्यात आली आहे, असेही जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.


हिडकल जलाशयातून धारवाड औद्योगिक क्षेत्रासाठी पाणी पुरवठा केला जात असून, यासाठी तीन विभागांनी आधीच परवानगी दिली आहे. धारवाडमधील केआयएडीबीमार्फत सुमारे 110 किमी लांब पाईपलाईन टाकून पाणी नेले जात आहे. मात्र, नेमकं किती पाणी नेले जाते याची माहिती उपलब्ध नाही. या संदर्भात बैठक घेऊन भविष्यात बेळगाव जिल्ह्यात पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहिणार आहे असे जारकीहोळी यांनी सांगितले.


कन्नड भाषेबाबत अभिनेते कमल हसन यांनी केलेल्या विधानाचा सतीश जारकीहोळी यांनी तीव्र शब्दात निषेध करत, “कन्नड भाषेला हजारो वर्षांचा इतिहास आहे. कमल हसन यांनी तात्काळ कन्नडीगांची माफी मागावी,” अशी जोरदार मागणीही सतीश जारकीहोळी यांनी केली.


[video width="544" height="960" mp4="https://bn7news.in/wp-content/uploads/2025/06/VID-20250602-WA0405.mp4"][/video]

 

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
श्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती  होन्निहाळ येथील 'त्या' खून खटल्यात 6 ऑगस्टला सुनावण्यात येणार शिक्षा ?धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा युवकांचा विजय; लोकशाहीचा विजय असल्याचा सिद्धरामय्या यांचा दावाबायपाससाठी जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध; एकरी ₹5 कोटी भरपाईच्या मागणीसाठी 30 जुलैला चक्काजाम आंदोलनधावत्या बसमध्ये सुरू झाला वाद; विद्यार्थ्यांमध्ये बेल्ट, दगड आणि काठ्यांनी तुफान हाणामारी!सेवानिवृत्तीनिमित्त सविता चंदगडकर-निकम यांचा वेदांत-गुरुस्पंदनने केला सन्मान मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते खरीप पीकविमा योजनेच्या माहितीपत्रकाचे प्रकाशनराजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाईन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद :  1011 विद्यार्थ्यांनी घेतला होता स्पर्धेत सहभागभडगावजवळील पूल कोसळला :  गडहिंग्लज-नेसरी रस्ता बंद मुडलगीत पावसासाठी गाढवांचा विवाह :  निमंत्रणपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल