LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

अंगावर झाड पडून एकाचा मृत्यू

कोप्पळ येथे घडली घटना

कोप्पळ : वादळी-वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे कोसळलेले झाड अंगावर पडून एका तरुणाचा मृत्यू झाला. कोप्पळ तालुक्यातील कामनूरजवळ ही घटना घडली. या घटनेत आणखीन एक व्यक्ती जखमी असून त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कोप्पळ जिल्ह्यात वादळी-वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरूच आहे. वादळी पावसामुळे कोसळलेले झाड किरण करबडीगे नामक दुचाकीस्वाराच्या अंगावर पडले. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. दुचाकीवर बसलेली आणखीन एक व्यक्ती जखमी असून त्या व्यक्तीवर कोप्पळ जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जिल्ह्यात 29 मे पर्यंत मुसळधार पाऊस आणि वादळ सुरू राहण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांनी जनतेला आवश्यक खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.  वादळी वाऱ्यासह होणाऱ्या पावसावेळी झाडाखाली थांबू नका, अनावश्यकपणे बाहेर जाणे टाळा, वाहन चालवताना अधिक काळजी घ्या अशी सूचना हवामान खात्याने केली आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट मेरीज संघाला विजेतेपदशिनोळी परिसरात गणेशमूर्तींवर रंगकामाचा अखेरचा हात : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची लगबग; साडेतीनशेहून अधिक मूर्ती सज्जन्यू इंग्लिश स्कूल, मुतगे येथे पालक मेळावा उत्साहात संपन्नमंत्री सतीश जारकीहोळींवर ईडीचा छापा; निकटवर्तीयांच्या घरांवरही झडतीमेंढ्या राखताना तरुणावर मगरीचा हल्ला; पायाला गंभीर दुखापतबेळगावमध्ये उभारण्यात येणार आयटी पार्क : पालक मंत्र्यांनी दिली आराखडा तयार करण्याची सूचना अत्रिवरद मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद सेंटरचे प्रमुख चिकित्सक, वैद्य रुपेश साळुंखे यांना करण्यात आले  'कर्नाटक हेल्थकेअर वैद्यरत्न पुरस्काराने' सन्मानीतविद्याभारती राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेला प्रारंभ : बेळगाव, बळ्ळारी, हावेरी, बेंगळूर, म्हैसूर संघांचा उपांत्य फेरीत प्रवेशराज्य रँकिंग स्पर्धेत बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरीश्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती