LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

आता 30 लाखांहून अधिकच्या मालमत्ता खरेदीसाठी '' पॅनकार्ड "ची सक्ती ..!

बेंगळूर – 30 लाख किंवा त्यापेक्षा जास्त मूल्याच्या मालमत्ता खरेदीसाठी विक्रेते आणि खरेदीदारांनी पॅन क्रमांक (Permanent Account Number) अनिवार्यपणे सादर करावे, अशी सक्त सूचना राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक विभागाने दिली आहे. पॅन तपशील न दिल्यास मालमत्तेची नोंदणी केली जाणार नाही, असे राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक विभागाने म्हटले आहे.


नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक आयुक्तांनी सर्व जिल्हा नोंदणी अधिकारी आणि उप-नोंदणी कार्यालयांना यासंबंधी परिपत्रक जारी केले आहे.
30 लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक मूल्याच्या मालमत्तांच्या नोंदणीसंबंधी विक्रेते आणि खरेदीदारांनी सारा तपशील आयकर विभागाला आर्थिक वर्षाच्या अखेरीस सादर करणे बंधनकारक आहे,” असे परिपत्रकात नमूद आहे.
विक्रेते आणि खरेदीदारांसाठी एक स्वतंत्र नमुना तयार करण्यात आलेला असून, त्यात सर्व आवश्यक माहिती भरून स्वाक्षरी करून, स्कॅन करून ‘कावेरी-2’ सॉफ्टवेअरवर अपलोड करावी लागेल. संपूर्ण आर्थिक वर्षात नोंदणीकृत मालमत्ता व्यवहारांची आणि खरेदीदार-विक्रेत्यांची माहिती ‘61-अ’ नमुन्यात आयकर विभागाला सक्तीने सादर करावी लागेल, असेही परिपत्रकात सांगण्यात आले आहे.


नोंदणी प्रक्रियेदरम्यान सादर करावयाच्या कागदपत्रे आणि स्वयंघोषणापत्र यांची यादीसुद्धा या परिपत्रकात समाविष्ट करण्यात आली आहे. ही सर्व माहिती दिल्यानंतरच दस्तऐवजांची नोंदणी पूर्ण होईल आणि संबंधितांना दस्तऐवज हस्तांतरित केला जाईल. अन्यथा दस्तऐवज देण्यास मनाई करण्यात आली आहे.


मालमत्ता खरेदीविषयक तपशील आयकर विभागाला सादर करण्याची प्रथा आधीपासूनच अस्तित्वात होती. मात्र, या तपशिलांचे सादरीकरण नियमित होत नव्हते. त्यामुळे आयकर विभागाकडून वारंवार हरकत नोंदवली जात होती. त्यामुळेच हा कठोर नियम जारी करण्यात आल्याचे समजते. या नियमामुळे आयकर फसवणुकीला आळा बसणार आहे.


Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
शांतिनिकेतन, संत मीरा,  देवेंद्र जीनगौडाने कब्बडी स्पर्धेत गाठली अंतिम फेरीजिल्हाधिकाऱ्यांनी केले उपमुख्यमंत्र्यांचे स्वागतराखेने भरलेला ट्रक विजेच्या खांबावर आदळून झाला पलटीपाणी पुरवठा विभागाने घेतली BN7 NEWS च्या वृत्ताची दखल : अवघ्या 8 तासात केली ' त्या ' जलवाहिनीची दुरुस्ती शिवराज्याभिषेक सोहळा : ज्ञानमंदिर बनले होते शिवमयविजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यूश्री मारुती नगरला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी विद्याभारती जिल्हास्तरीय शैक्षणिक संमेल्लन उत्साहात.गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 10 लाखांची शिष्यवृत्ती : पोतदार एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम132 जणांनी केले रक्तदान : रक्तदात्यांना 1 लाखांचा विमा :  राष्ट्रीय बसव दलाचा आदर्श उपक्रम