LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

आता सरकारी कर्मचाऱ्यांवर डिजिटल नजर ..!

बेंगळूर : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता नवीन जिओ-टॅग्ड उपस्थिती प्रणाली लागू करण्यात आली असून, सर्व कर्मचाऱ्यांनी दररोज सकाळी 10 वाजेपर्यंत कार्यालयात उपस्थित राहून ‘कर्तव्य’ ॲप द्वारे  हजेरी नोंदवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

कर्मचारी प्रत्यक्ष कार्यालयात उपस्थित राहूनच हजेरी लावतील याची खात्री करण्यासाठी राज्य सरकारने ही डिजिटल व्यवस्था सुरू केली आहे. यासंदर्भात वित्त विभागाच्या मानव संसाधन व्यवस्थापन प्रणाली (HRMS) विभागाने सर्व विभागप्रमुख तसेच ड्रॉइंग अँड डिस्बर्सिंग अधिकाऱ्यांना परिपत्रक जारी केले आहे.

या नव्या व्यवस्थेनुसार प्रत्येक सरकारी कार्यालयाचे भौगोलिक स्थान (Geo-Coordinates) पडताळून निश्चित केले जाणार आहे. कर्मचारी कार्यालयात आल्यानंतरच अॅपवर हजेरी नोंदवू शकतील. जिओ-टॅगिंग तंत्रज्ञानाद्वारे संबंधित कर्मचारी निश्चित कार्यालयीन ठिकाणी उपस्थित आहेत की नाही, याची खात्री केली जाईल.

यासाठी राज्याच्या ई-गव्हर्नन्स विभागाने विकसित केलेले ‘कर्तव्य’ ॲप सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी डाउनलोड करून नोंदणी करणे आवश्यक आहे.

वित्त विभागाच्या माहितीनुसार, यापूर्वी अस्तित्वात असलेली बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली अनेक ठिकाणी प्रभावीपणे कार्यरत नव्हती. काही कार्यालयांमध्ये यंत्रे बंद असल्याचे कारण देत उपस्थिती नोंदविण्याकडे दुर्लक्ष केले जात होते. मात्र, नव्या जिओ-टॅग्ड प्रणालीमुळे अन्य ठिकाणाहून हजेरी लावणे शक्य होणार नाही. कर्मचाऱ्यांना कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहूनच रिअल-टाइममध्ये हजेरी नोंदवावी लागणार आहे.

मुख्य सचिव शालिनी रजनीश यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सकाळी  10 वाजण्यापूर्वी कार्यालयात उपस्थित राहून ‘कर्तव्य’ ॲपवर हजेरी नोंदवावी, असे निर्देश दिले आहेत. तसेच हजेरी नोंदविण्यात अपयशी ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत अहवाल सादर केला जाईल, असा ईशाराही देण्यात आला आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST