LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

नितीन शिंदे फायटर्स अरिहंत चषकाचा मानकरी

राजमनी ट्रॅव्हल्स ठरला उपविजेता

 निपाणी  : नितीन शिंदे फायटर्सने राजमनी ट्रॅव्हल्सला पराभूत करत श्री बालवीर स्पोर्ट्स क्लब आयोजित 'अरिहंत चषक' व्हॉलीबॉल लीग स्पर्धा चषक पटकाविला.

 अंतिम सामन्यात  नितीन शिंदे फायटर्सने  राजमनी ट्रॅव्हल्स संघाचा 3-1 अशा सेटने पराभव करत अरिहंत चषक पटकावला. विजेत्या संघाला प्रथम क्रमांकाचे 15 हजार रुपयांचे रोख बक्षीस व अरिहंत चषक देण्यात आले.

उपविजेत्या राजमनी ट्रॅव्हल्सला 10 हजार रुपये  व चषक तर तृतीय क्रमांकाच्या नटराज फायटर संघाला 7 हजारचे बक्षीस व चषक देऊन गौरविण्यात आले.
 
अमोल जाधव हा मॅन ऑफ द टूर्नामेंट खेळाडू ठरला. बेस्ट स्मॅशर कृपेश पाटील, बेस्ट लिफ्टर मयूर आजरेकर, व बेस्ट डिफेंडर आदित्य जाधव हे ठरले. 
सहकाररत्न उत्तम पाटील यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांना आणि उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या खेळाडूंना पारितोषिके देवून सन्मानित करण्यात आले.

श्री बालवीर स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष पुष्कराज तारळे यांनी स्वागत केले. यावेळी प्रतीक शहा, दिलीप पठाडे, गणेश कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले क्लबचे उपाध्यक्ष प्रा. शिवाजी मोरे व सचिव प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक तर भैय्या कडगावे यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमास माजी नगरसेवक रवींद्र शिंदे, बळीराम भराडे, कांतीलाल राठोड, प्रा. आर. के. दिवाकर, सुधाकर माने, दोस्त महम्मद पठाण, शेरू बडेघर, इमाम बागवान, अजित बगाडे, कपिल शिंदे, इम्रान मकानदार, शिरीष कमते यांच्यासह नागरिक उपस्थित होते. दीपक चव्हाण, अनिल देवडकर, भालचंद्र आजरेकर, दत्ता ढेंगे, मारिया सुतार, गौरव बोरगावे यांनी पंच म्हणून काम पाहिले. क्लबचे खजिनदार अजय जाधव यांनी आभार मानले.news_1779282946_0_540.webp

 

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
नितीन शिंदे फायटर्स अरिहंत चषकाचा मानकरीजिल्हा इस्पितळात पूर्णवेळ डॉक्टर नियुक्त करावा डीडीपीआय कार्यालयाला आले चक्क सायकलवरून ...!सोलापूरच्या समर्थ क्रीडा फुटबॉल क्लबला नमवत बेळगावच्या मानस फुटबॉल अकादमीने पटकाविले विजेतेपदबेळगांवच्या स्केटिंगपटूनी केली 9 पदकांची कमाईमुलांवर वाचन संस्कार होणे गरजेचे : शिवाजी हसनेकर.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजय