LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

बेळगावात पहिल्यांदाच भरणार पावसाळी अधिवेशन ...!

बेळगाव : बेळगावच्या सुवर्णसौधमध्ये पहिल्यांदाच पावसाळी अधिवेशन भरविण्यात येणार आहे. बेळगावला पावसाळी अधिवेशन भरवून मुख्यमंत्री सिद्धरामय्या उत्तर कर्नाटकाला विशेष प्राधान्य देत नवा इतिहास घडविण्याच्या तयारीत आहेत.


उत्तर कर्नाटकातील ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी राज्याची दुसरी राजधानी असणाऱ्या बेळगावमध्ये हिवाळी अधिवेशन भरते. मात्र हे हिवाळी अधिवेशन दरवेळी केवळ औपचारिकता ठरत असल्याची टीका होत होती. मात्र आता मुख्यमंत्री सिद्धरामय्या उत्तर कर्नाटकाला विशेष प्राधान्य देत बेळगावात पहिल्यांदाच पावसाळी अधिवेशन भरविणार आहेत.
कर्नाटक विधानमंडळाच्या इतिहासात प्रथमच पावसाळी अधिवेशन जूनच्या दुसऱ्या आठवड्यात सुवर्ण विधान सौध येथे घेण्याच्या निर्णयावर जवळपास शिक्कामोर्तब झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेच्या सभापतींसोबत याबाबत चर्चा केली असून सर्व काही नियोजनानुसार झाले तर जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून दहा दिवसांचे पावसाळी अधिवेशन बेळगावात होणार आहे.
गेल्या 13 वर्षांपासून बेळगाव येथे दरवर्षी डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशन भरवले जात आहे. डिसेंबरमधील हे अधिवेशन वर्षाअखेरीची परंपरा बनले होते. वर्षातून एकदाच बेळगावात अधिवेशन घेण्याची प्रथा होती. मात्र यंदा दोन्ही सभागृहांसाठी महत्त्वाचे मानले जाणारे पावसाळी अधिवेशन बेळगावात घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी घेतला आहे.
यातून उत्तर कर्नाटकाला केवळ प्रतीकात्मक नव्हे तर प्रत्यक्ष प्राधान्य दिले जात असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न सिद्धरामय्या सरकारकडून केला जात आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
शांतिनिकेतन, संत मीरा,  देवेंद्र जीनगौडाने कब्बडी स्पर्धेत गाठली अंतिम फेरीजिल्हाधिकाऱ्यांनी केले उपमुख्यमंत्र्यांचे स्वागतराखेने भरलेला ट्रक विजेच्या खांबावर आदळून झाला पलटीपाणी पुरवठा विभागाने घेतली BN7 NEWS च्या वृत्ताची दखल : अवघ्या 8 तासात केली ' त्या ' जलवाहिनीची दुरुस्ती शिवराज्याभिषेक सोहळा : ज्ञानमंदिर बनले होते शिवमयविजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यूश्री मारुती नगरला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी विद्याभारती जिल्हास्तरीय शैक्षणिक संमेल्लन उत्साहात.गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 10 लाखांची शिष्यवृत्ती : पोतदार एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम132 जणांनी केले रक्तदान : रक्तदात्यांना 1 लाखांचा विमा :  राष्ट्रीय बसव दलाचा आदर्श उपक्रम