LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

यत्नाळ यांच्या निलंबनविरोधात जनताच उत्तर देईल : आमदार लक्ष्मण सवदी

चिक्कोडी (बेळगाव): बसनगौडा पाटील यत्नाळ यांच्या निलंबनविरोधात जनताच ठोस उत्तर देईल असे अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी म्हणाले.


यत्नाळ यांच्या निलंबनामुळे उत्तर कर्नाटकमध्ये उलट-सुलट साद-पडसाद उमटत असून मनपरिवर्तनाला सुरूवात झाली आहे. आता या भागातील जनता परिस्थितीनुसार भाजपला काय उत्तर द्यायचं ते पुढे ठरवेल, असे सूचक वक्तव्य अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी यांनी केले आहे.


अथणी तालुक्यातील झुंजरवाड गावात सुरू असलेल्या अम्माजेश्वरी उपसा सिंचन प्रकल्पाच्या जॅकवेल कम पंप हाऊसच्या बांधकामाच्या पूजनानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.


पक्षातील अंतर्गत गोष्टींबाबत चर्चा करणं योग्य नाही,
आज मी काँग्रेस पक्षाचा सदस्य आहे. दुसऱ्या पक्षाबद्दल चर्चा करणं किंवा विचार करणं योग्य नाही. त्या पक्षात काय घडतंय हे पाहणं त्यांचं काम आहे. मी पूर्वी भाजपमध्ये होतो, पण आता नाही. सध्या मी काँग्रेसचा आमदार आहे. त्यामुळे त्या पक्षाच्या अंतर्गत गोष्टींबाबत बोलणं योग्य वाटत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.



वक्फचा विषय संपलेला आहे. एनडीए शिवाय सर्वच पक्षांनी या कायद्याला विरोध दर्शवला आहे. बहुमत असल्यामुळे एनडीए सरकारने तो कायदा संमत केला. याचे फायदे-तोटे काय होतील हे येणाऱ्या काळात दिसून येईल. काही लोक न्यायालयात जाण्याची तयारी करत आहेत. काय घडतंय ते पाहूनच मी यावर पुढे प्रतिक्रिया देईन."असे केंद्र सरकारने वक्फ कायद्यात केलेल्या सुधारणांबद्दल बोलताना ते म्हणाले.


भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करताना मतदारसंघाच्या विकासासाठी निधीची मागणी केली होती. त्यावेळी तीन प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या होत्या. यापैकी दोन मागण्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पूर्ण केल्या असून एक मागणी अद्याप प्रलंबित आहे, असे अथणी मतदारसंघाला मिळालेल्या निधीबद्दल बोलताना ते म्हणाले.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
शांतिनिकेतन, संत मीरा,  देवेंद्र जीनगौडाने कब्बडी स्पर्धेत गाठली अंतिम फेरीजिल्हाधिकाऱ्यांनी केले उपमुख्यमंत्र्यांचे स्वागतराखेने भरलेला ट्रक विजेच्या खांबावर आदळून झाला पलटीपाणी पुरवठा विभागाने घेतली BN7 NEWS च्या वृत्ताची दखल : अवघ्या 8 तासात केली ' त्या ' जलवाहिनीची दुरुस्ती शिवराज्याभिषेक सोहळा : ज्ञानमंदिर बनले होते शिवमयविजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यूश्री मारुती नगरला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी विद्याभारती जिल्हास्तरीय शैक्षणिक संमेल्लन उत्साहात.गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 10 लाखांची शिष्यवृत्ती : पोतदार एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम132 जणांनी केले रक्तदान : रक्तदात्यांना 1 लाखांचा विमा :  राष्ट्रीय बसव दलाचा आदर्श उपक्रम